आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चिमुरड्याच्या Smartness चे फॅन झाले आनंद महिंद्रा, Video शेअर करत दिली जॉबची ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - भारतातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक आनंद महिंद्रा एका 6 महिन्यांच्या बाळाचे फॅन झाले आहेत. त्याच्या स्मार्टनेसने महिंद्रा यांना चकित केले. एवढेच नव्हे, तर त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करून त्या बाळाला चक्क जॉबची ऑपर दिली आहे. निश्चितच या मुलाला आपण प्लेसमेंट देणार असे त्यांनी आश्वस्त केले. महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्वीट करून मुलाचे कौतुक केले. व्हिडिओ वर्षभर जुना असला तरीही तो सोशल मीडियावर आता पुन्हा व्हायरल होत आहे. 

 
व्हिडिओमध्ये नेमके काय?
या व्हिडिओमध्ये एका लहानसा मुलगा बेडवर बसलेला आहे. त्याला खाली उतरण्यासाठी पलंग खूप उंच होता. अशात तो रडला नाही. त्याने स्वतःच खाली उतरण्यासाठी शक्कल लढवली. बेडवर असलेल्या उश्या त्याने साइडला एकावर एक ठेवून त्यांची पायरी बनवली आणि त्यावर उडी मारून अतिशय चलाखीने तो खाली उतरला. हा सीसीटीव्ही फुटेज त्याच्या पालकांनी गेल्या वर्षी शेअर केला होता. तो त्यावेळी फक्त 6 महिन्यांचा होता. 


काय म्हणाले आनंद महिंद्रा?
आनंद महिंद्रा यांनी लिहिले, "मी या लहानच्या मुलासोबत करार करू इच्छितो. एकदा त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले तर तो आपल्या सर्वच प्रोजेक्ट्सला असेच सहजपणे लँड करू शकेल... काय जीनियस आहे हा."

बातम्या आणखी आहेत...