आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपा आणि मोदींच्या यशाबद्दल लंडनमध्ये लोकांनी केला गरबा, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - लोकसभा निवडणुकीतील मोदींच्या विजयाचा आनंद परदेशात साजरा करण्यात येत आहे. लंडनमध्ये मेट्रो स्टेशनच्या बाहेर गरबा गाण्यावर डान्स करणाऱ्या लोकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजराती असून पंतप्रधान होण्यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 

 

महिंद्राने सोशल मीडियावर आपल्या अंदाजात लोकांकडून सल्ला मागितला. स्वतःची गरबा स्किल चांगली करण्यासाठी त्यांनी लोकांना गरबा डान्सचे व्हिडिओ शेअर करण्याची विनंती केली होती. यानंतर अनेकांनी त्यांना उत्तर देत गरबाचे व्हिडिओ शेअर केले.  

 

 

सोशल मीडियावरील सर्वाधिक सक्रिय व्यावसायिक
महिंद्रा यांनी स्वतः देखील सोशल मीडियाद्वारे मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले होते की, मोदी लोकशाही पद्धतीने निवडले गेलेले जगातील सर्वाधिक शक्तिशाली नेता बननण्याचा जवळ आहेत. महिंद्रा सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय व्यावसायिक आहेत. ट्विटरवर त्यांचे 70 लाख फॉलोअर आहेत.