आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप अॅक्टीव्ह असतात. देशात चाललेल्या घडामोडींबद्दल आणि इतर प्रेरणादायी गोष्टींवद्दल ते नेहमीच ट्विटरवरुन माहिती देतात. नुकतंच त्यांनी एक रिक्षा चालकाचे कौतुक केले आहे. नीरज नावाच्या एका युजरने आपल्या अकाउंटवरुन एका रिक्षाचा फोटो शेअर केला. त्यात त्या यायकल रिक्षावर महिंद्रा कंपनीचा लोगो उलटा लावलेला दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी त्या फोटोला रिट्वीट केले आणि त्या रिक्षा चालक्या उज्वल भविष्यासाठी चांगले साधन मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.
I suppose you found this funny Neeraj & yes it is, especially since the logo has also been applied upside down! But I’m thrilled, because if a rickshaw driver sees our brand as aspirational, then we will provide him new & upgraded forms of mobility as he ‘Rises’ in life... https://t.co/rcVhsVZrwv
— anand mahindra (@anandmahindra) November 28, 2019
महिंद्रांनी ट्वीटमध्ये लिहीले, "वाटतं हे खूप मजेशीर आहे. यात फोटो उल्टा लावलेला आहे, मी खूप रोमांचित आहे. एक रिक्षा चालक आम्हाला प्रेरणास्त्रोत मानतो. भविष्यात त्याची प्रगती व्हावी म्हणून त्याला आम्ही आम्ही नवीन साधन उपलब्ध करून देऊ.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.