आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम नरेंद्र मोदी चित्रपट : 'होय, मी ३० वर्षे भाजपचा सदस्य, महाराष्ट्र भाजपचा कोषाध्यक्ष होतो. चित्रपटाचा निवडणुकीशी संबंध नाही' - चित्रपट निर्माता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणूक आयोगाने हिरवी झेंडी दाखवल्यावर alt147पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होईल. चित्रपटाचा भाजपशी संबंध नसल्याचे चित्रपटाच्या चार निर्मात्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले. मात्र या निर्मात्यांपैकी एक आनंद पंडित हे ३० वर्षे भाजप सदस्य होते. ते भाजपच्या कॉमर्स सेलचे संयोजक व महाराष्ट्र भाजपचे कोषाध्यक्षही होते. ब्रिटिश व्हर्जिन आइसलँडमध्ये कंपनी स्थापन करून अवैधरीत्या अघोषित संपत्ती तेथे गुंतवल्याचा आरोपही आनंद यांच्यावर झाला होता. या मुद्द्यांसह चित्रपटासंबंधीच्या वादाबाबत आनंद पंडित यांच्याशी 'भास्कर'च्या विशेष प्रतिनिधी मनीषा भल्ला यांनी केलेली चर्चा व या मुलाखतीतील काही मुख्य मुद्दे... 
पंडितांना संयोजक नेमल्याची माहिती भाजपच्या साइटवरून काढली 


तुम्ही म्हणता, या चित्रपटाचा भाजप किंवा मोदींशी काही संबंध नाही. दुसरीकडे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००६ मध्ये तुम्ही भाजप वाणिज्य सेलचे संयोजक झालात. आता ऐन निवडणुकीत आलेल्या या चित्रपटाचा उद्देश मोदींना लाभ देणे हा नाही, हे कसे मानायचे? 
> हो, मी २५-३० वर्षांपासून कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र भाजपचा कोषाध्यक्षही होतो. ४ वर्षांपासून मी कोणत्याही पदावर नाही. परंतु, चित्रपटाचा याच्याशी काय संबंध? हा व्यावसायिक चित्रपट आहे. 
विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत आहे. त्याचे वडील सुरेश ओबेरॉय सहनिर्माते आहेत. ते २००४ मध्ये भाजपच्या सांस्कृतिक सेलचे संयोजक होते. हा काय केवळ योगायोग म्हणायचा?  अर्थातच. आम्ही सध्याचा काळ आणि संधी पाहून चित्रपट बनवला आहे. 


भाजपसाठी काम करणाऱ्या कंपनीचे शेअरहोल्डर हितेश जैन तुमचे वकील असल्याचे बोलले जाते. त्यांची ब्लूक्रॉफ्ट कंपनी अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांसोबत काम करत आहे. याकडे तुम्ही कसे पाहता? 
> होय हे खरे आहे. परंतु, जो विश्वासू वाटतो त्यालाच मी कंपनीत घेईन. कपिल सिब्बल यांना तर घेणार नाही? ज्यांना मोदींबद्दलच्या माहितीत रस आहे त्याच्यावरच मी विश्वास ठेवेन. 

 

२०१३ मध्ये प्राप्तिकर विभागाने तुम्हाला ब्रिटिश व्हर्जिन आइसलँडमध्ये कंपनी स्थापन करून अघोषित संपत्ती लपवल्यावरून आरोपी केले होते. फेमाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा अारोपही केला होता. काय सांगाल? 
> त्या प्रकरणात विशेष असे काहीच नाही. त्याची चौकशी संपली आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र आहे. 

 

विरोधी पक्ष चित्रपटास विरोध करत आहेत. याकडे कसे पाहता? 
> विरोध कशासाठी करत आहेत.. मी एक निर्मिती केली आहे. ती विकण्याची वेळ मीच ठरवणार. दुसरा कोणी नाही. होळीमध्ये रंगाएेवजी फटाके विकणार नाही किंवा दिवाळीला रंग विकणार नाही...! हा चित्रपट कमर्शियल प्रोजेक्ट आहे. फायदा कमावण्यासाठी तो तयार केला आहे. निवडणुुकीत पुस्तके प्रसिद्ध होत नाहीत का? जेव्हा आत्मचरित्र येऊ शकते मग आत्मचरित्रपट (चित्रपट)का नाही? लाेकशाहीत सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. चित्रपटास विरोध करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण तो विरोधासाठी विरोध आहे. 

 

चित्रपटाची कल्पना कोणाची होती? तुम्ही पंतप्रधान किंवा भाजपच्या अन्य नेत्यांची भेट घेतली होती का? 
> ३८ दिवसांत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाची कल्पना विवेक ओबेरॉयची होती. ती प्रत्यक्षात आम्ही आणली. चित्रपटातील माहितीसाठी लेखकांनी भाजप नेत्यांची भेट घेतली असेल. मला याची माहिती नाही. 

 

आत्मचरित्रपटात जसोदाबेन आहेत? 
> होय. प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी चित्रपटात काही सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे. 
फक्त ३८ दिवसांत तयार झालेल्या मोदींवरील चित्रपटाला न्याय देऊ शकलात काय? 
प्री-प्रॉडक्शनवर चित्रपटाचे ६० टक्के यश, पोस्ट प्रॉडक्शनला २० टक्के व शूटिंगनंतर २० टक्के यश अवलंबून असते. आमचे प्री प्रॉडक्शन काम मजबूत होते. यावर चार वर्षांपासून काम सुरु होते. यासाठी चित्रीकरण सोपे झाले. 

 

मोदींच्या भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयच का? त्याच्यात व मोदीत साम्य दिसत नाही. 
> आत्मचरित्रासाठी प्रत्यक्षातील पात्राशी त्याची चेहरेपट्टी जुळणे आवश्यक नाही. मेरी कोम, चक दे इंडिया याची उदाहरणे आहेत. जर हीरोचा चेहरा प्रत्यक्षातील पात्राशी जुळला तर तो विनोदी ठरतो. 

 

चित्रपटाचे बजेट किती होते? किती स्क्रीनवर तो रिलीज होतो आहे? 
> ३० कोटी रुपयांत तयार झालेला हा चित्रपट २४०० स्क्रीनवर रिलीज होत आहे. यात १५०० हिंदी भाषक, ३०० इतर भाषात व ६०० स्क्रीन ओव्हरसिजमध्ये आहेत. 

 

मोदी व बॉलीवूड जवळचे संबंध आहेत. असे खूप कमी पाहण्यात आले . असे का? 
> होय. कारण मोदींना चित्रपटाची ताकद माहिती आहे. बॉलीवूड बोलतो तेव्हा देश ऐकतो, याची कल्पना आहे. त्यांना ही शक्ती देशहितासाठी वापरायची होती. सिनेमा ध्रुवीकरणाचे काम करते. 
  

बातम्या आणखी आहेत...