आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशा अंबानीला या खास ठिकाणी आनंद पीरामल यांनी केले होते प्रपोज, महाबळेश्वरमध्ये आहे आलिशान बंगला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची कन्या ईशा आणि पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचे चिरंजीव आनंद पिरामल यांचा आज (21 सप्टेंबर) इटलीतील लेक कोमो येथे साखरपुडा आहे. तीन दिवस त्यांच्या साखरपुड्याचा जल्लोष सुरु राहणार आहे. साखरपुड्यानंतर याचवर्षी 12 डिसेंबर रोजी दोघे मुंबईत विवाहबद्ध होणार आहे. 

 

मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात.. 
अंबानी आणि पीरामल यांचे गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. आनंद आणि ईशा यांच्यातदेखील अनेक वर्षांपासून मैत्री आहे. त्यांच्या या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता हे दोघे साताजन्माच्या गाठीत अडकमार आहेत. आनंद यांनी याचवर्षी ईशाला महाबळेश्वर येथील एका मंदिरात प्रपोज केले होते. आनंद यांच्या वडिलांचा महाबळेश्वर येथे आलिशान बंगला आहे.

 

12 वर्षांपूर्वी खरेदी केला होते ग्रीनवुड्स
- अजय पिरामल आणि त्यांची पत्नी स्वाती यांनी 2006 मध्ये हॉलिडे होमच्या रुपात महाबळेश्वर येथ ग्रीनवुड्स बंगला खरेदी केला होता.
- सांगलीचे महाराज विजय सिंग पटवर्धन यांच्या पूर्वजांनी 1862 मध्ये या बंगल्याचे बांधकाम केले होते.
- पिरामल यांनी या हेरिटेज बिल्डिंगला खरेदी करून रिस्टोअर केले होते.
- बंगला मराठा-विक्टोरियन स्टाईलमध्ये बांधण्यात आला आहे.

 

विविध फुलांनी सजला आहे ग्रीनवुड्स
- स्वाती पिरामल यांना गार्डेनिंगची आवड आहे. बंगल्याच्या चौफेर विविध फुलझाडे आहेत.
- ग्रीनवुड्स बंगल्यात ऑर्किड, लिली, आफ्रिकन डेजी, अलकेमिलिया, एस्टर, डेफोडिल, क्विंस, मांडेविला आदी व्हरायटी आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... महाबळेश्वर येथील ग्रीनवुड्‍स बंगल्याचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...