आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधानावर विश्वास, तेच मला अाराेपातून मुक्त करेल : तेलतुंबडे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लाेकशाही व सरकारी धाेरणाबद्दल बाेलणाऱ्याला माअाेवादी ठरवले जाते. माझ्यासारख्या शिकलेल्या विचारवंताची ही अवस्था अाहे, तर मग सर्वसामान्य माणसाची काय असेल? यावर मी काहीही बाेलणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर व संविधानावर पूर्ण विश्वास अाहे व तेच मला या सर्व अाराेपातून मुक्त करतील, असा विश्वास प्रा. अानंद तेलतुंबडे यांनी व्यक्त केला आहे. 
साेमवारी मुंबई मराठी पत्रकार संघाने अायाेजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वाेच्च न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिलेली असताना ताे डावलूून सत्र न्यायालयाच्या अादेशाने मला अटक करण्यात अाली. हा माझ्याविराेधात नव्हे तर भारतीय नागरिकांविराेधात कट अाहे. या षड््यंत्राबाबत मी काेणावर अाराेप करणार नाही. सरकारच्या धाेरणाविराेधात बाेलणाऱ्यांचे असेच हाल केले जातात. पुणे पाेलिसांनी सादर केलेल्या पत्रात माझा केलेला उल्लेख ही सपशेल दिशाभूल अाहे. पॅरिसमधील माझ्या सहलीला माअाेवाद्यांकडून पैसा पुरवण्यात अाला हा अाराेपही धादांत खाेटा असल्याचे तेलतुंबडे म्हणाले. 

 

अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज 
पुणे | डॉ. आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत विशेष न्यायालयाने त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले. मात्र, येथील न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...