आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद कौटुंबिक न्यायालयातच पत्नीला मारहाण, डॉक्टरसह 5 जणांवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - नवीन हॉस्पिटल उभारणीसाठी ,कारसाठी एक कोटी रुपये घेऊन ये म्हणून छळ करणाऱ्या व कौटुंबिक न्यायालयात या प्रकरणात समुपदेशन सुरू असताना पत्नीला मारहाण करणाऱ्या उस्मानाबादेतील डॉक्टरसह त्याच्या पाच नातलगांविरोधात आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.१९) दुपारी एक वाजेच्या सुमारास उस्मानाबादेत घडली.


फिर्यादी डॉ. शैला यांचा उस्मानाबाद तालुक्यातील नांदुर्गा येथील रहिवाशी व सध्या तांबरी विभागात राहणारा डॉ. संतोष पाटील याच्याशी २००८ मध्ये विवाह झाला आहे. परंतु, लग्नानंतर नणंद व सासू, सासरे लग्न व्यवस्थित करून दिले नाही, आमचा मानपान झाला नाही असे बोलू लागले. तसेच लग्नात कार दिली नाही, सोने घातले नाही असे म्हणत पती डॉ. संतोषसह सासू सुनंदा पाटील, सासरे हरिश्चंद्र पाटील, मंगल विठ्ठल मोरे (नणंद रा. बार्शी नाका) व प्रमोदिनी तानाजी बिचकुले (नणंद रा. अकलूज) यांनी  डॉ. शैलाचा जाच, छळ सुरू केला. यामुळे शैलाच्या आई-वडील व नातलगांनी उस्मानाबादेत येऊन डॉ. संतोष पाटीलसह कुटुंबीयांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु, काहीच फरक पडला नाही. उलट डॉ. शैला यांना घराबाहेर हाकलले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे त्या मुलासह सध्या पुणे येथे राहण्यास आहेत. डॉ. संतोष पाटील याने पत्नीपासून विभक्त होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला.

 

समुपदेशनासाठी डॉ. शैला या उस्मानाबादेत आल्या. दुपारी १ वाजता कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक गव्हाळे यांच्या कक्षात समुपदेशनाचे कामकाज सुरू असताना अचानक डॉ. संतोष पाटील याने पत्नी डॉ. शैलाला शिवीगाळ करत मारहाण केली.  तुझा खून करून जेलमध्ये जाऊन बसतो, असे धमकावले.  डॉ. शैला पाटील  यांच्या फिर्यादीवरून पती डॉ. संतोष पाटील, सासू सुनंदा पाटील, सासरे हरिश्चंद्र पाटील, नणंद मंगल मोरे व प्रमोदिनी बिचकुले यांच्यावर आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...