Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Anandi Wankhede Comment on Malegaon Part 2 in Aurangabad

भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी मालेगाव भाग- 2 चे षड्यंत्र हाणून पाडू- आनंदी वानखेडे

प्रतिनिधी | Update - Dec 18, 2018, 06:46 PM IST

हिंदुत्ववादी संघटनांच्या 18 कार्यकर्त्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे

  • Anandi Wankhede Comment on Malegaon Part 2  in Aurangabad

    औरंगाबाद- भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी मालेगाव भाग-2 चे षड्यंत्र रचून सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्ववादी संघटनांना गुंतवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा षड्यंत्र हाणून पाडू, असे प्रतिपादन आनंदी वानखेडे यांनी केले. शहरात आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.

    पुढे त्या म्हणाल्या की, गौरी लंकेश हत्या प्रकरणी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या 18 कार्यकर्त्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकच्या विशेष अन्वेषण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ग्रंथाचे वाचन करुन हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ते हास्यास्पद आहे. जर हिंदू धर्म ग्रंथ वाचून हिंदुत्ववादी संघटना हत्या करत असतील तर जगभरात चाललेल्या बॉमस्फोटे आणि हत्या यांचा उच्छाद कोणता ग्रंथ वाचून केला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

    नाताळ-नववर्षानिमित्त फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा
    सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या निर्णयानुसार फटाके फोडण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. नाताळ व नवीन वर्षासाठी रात्री 11.55 ते 12.30 या वेळेतच फटाके फोडण्याची वेळ देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणाच्या काळात न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहे. दिवाळीप्रमाणे नाताळ व 31 डिसेंबर मध्यरात्रीनंतर फटाके उडवणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी या वेळी करण्यात आली, अशी माहिती एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. पत्रकावर श.य.चावड यांची स्वाक्षरी आहे.

Trending