आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार पाडावी आपली सामाजिक जबाबदारी, अनंत चतुर्दशीला घरात करावे गणेश मूर्तीचे विसर्जन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी गणेश उत्सवाचे समापन होते आणि पूर्ण श्रद्धेने श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. यावेळी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर, रविवारी आहे. दिव्य मराठीच्या उपक्रमामुळे हजारो भक्तांनी श्रीगणेशाची मातीपासून तयार केली मूर्ती घरात स्थापित केली. आता आज विसर्जन आहे. मातीपासून बनवलेल्या या गणेश मूर्ती तुम्ही घरातच विसर्जित करू शकता. असे का करावे, जाणून घ्या...


1. परंपरेनुसार अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. शास्त्रोक्त मान्यतेनुसार ज्या मूर्तीची स्थापना होते तिचे विसर्जन होणे आवश्यक आहे.
2. या मूर्तींचे विसर्जन नदीमध्येच करावे असा कोणताही नियम नाही. उत्तम उपाय म्हणजे पूजा-अर्चना झाल्यानंतर घरातच स्वच्छ पाण्यामध्ये मूर्ती विसर्जन करावे.
3. ज्या भांड्यामध्ये मातीपासून निर्मित मूर्तीचे विसर्जन केले जाईल ती माती आणि पाणी पवित्र झाडाला अर्पण करावे. हेच खरे विसर्जन होईल.
4. अशाप्रकारे घरातच मूर्ती विसर्जन केल्याने जल तत्त्वाची पावित्र्य राहील आणि आपण आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडण्यात यशस्वी होऊ.

बातम्या आणखी आहेत...