आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत चतुर्दशी आज : याप्रकारे घरातच करा गणेश मूर्तीचे विसर्जन, जाणून घ्या, शुभ मुहूर्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी (23 सप्टेंबर, रविवार) साजरी केली जाते. या दिवशी 10 दिवसीय गणेशोत्सवाचे समापन होते आणि घरामध्ये स्थापित गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. विसर्जन करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे आवश्यक आहे.


पूजन विधी
विसर्जनापूर्वी स्थापित गणेश मूर्तीचा संकल्प मंत्र घेऊन गणेशाची पंचोपचार पूजा करावी. गणेशाच्या मूर्तीवर अक्षता, गुलाल, लाल फुल, दुर्वा इ. पूजन सामग्री अर्पण करावी. श्रीगणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. पूजा करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...


ऊँ गं गणपतये नम:


गणपतीला दुर्वा अर्पण करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...
ऊँ गणाधिपतयै नम:
ऊँ उमापुत्राय नम:
ऊँ विघ्ननाशनाय नम:
ऊँ विनायकाय नम:
ऊँ ईशपुत्राय नम:
ऊँ सर्वसिद्धप्रदाय नम:
ऊँ एकदन्ताय नम:
ऊँ इभवक्त्राय नम:
ऊँ मूषकवाहनाय नम:
ऊँ कुमारगुरवे नम:


त्यानंतर श्रीगणेशाची आरती करून घरातच गणेश मूर्तीचे विसर्जन करून खालील मंत्राचा उच्चार करावा


यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम् ।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥


थोड्यावेळाने हे पवित्र पाणी घरातील झाडांना टाकावे. अशाप्रकारे गणेश विसर्जन केल्यास गणेशाची कृपा कुटुंबावर राहील.


विसर्जनाचे शुभ मुहूर्त
सकाळी 08:00 ते 12.30 पर्यंत
दुपारी 02:00 ते 03:30 पर्यंत
संध्याकाळी 06:30 ते 11.00 पर्यंत


गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच का करावे...
गणेशोत्सव हा फक्त भक्ती आणि आनंदाचाच उत्सव नाही तर त्यात पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेशदेखील आहे. गणपतीचा जन्म पार्थिव तत्त्वापासून झाला. ते जलतत्त्वाचे देवता आहेत. या कारणांमुळेच त्यांची मूर्ती पारंपरिक पद्धतीने मातीपासूनच घडवली जाते आणि पूजा आराधनेनंतर त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते. म्हणूनच ज्या देवतेचा जन्म मातीतून झाला आणि ज्यांचे मूळ पाण्याशी निगडित आहे त्या देवतेच्या उत्सवात माती आणि जलतत्त्वांना नुकसान पोहोचवणे योग्य नाही.


- सार्वजनिकरीत्या चौक आणि इतर ठिकाणी विशाल श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. विशाल आकार आणि सुबकतेसाठी बहुतांश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसने घडवल्या जातात. 


- पीओपीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. पीओपीच्या मूर्ती विसजिर्त केल्यानंतर त्यातील सामग्री आणि घातक रसायनांमुळे नद्या, जलाशय, विहिरी प्रदूषित होतात. श्रीप्रतिमा लहान आणि मातीच्या घडवून त्यांचे विसर्जन घरातच केले जावे. यामुळे आपल्या पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाहीत. तसेच हे शास्त्रसंमतही आहे.

बातम्या आणखी आहेत...