आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांना शेतीच्या कामात मदत; बाॅक्सिंगमध्ये मिळवले सुवर्णपदक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मेहनत करण्याची तयारीला इच्छाशक्तीची साथ मिळाल्यावर अनेक अडचणींवर सहज मात करता येते. तसेच निश्चित केलेले ध्येयही यशस्वीपणे गाठता येते, याचाच प्रत्यय अकाेल्याच्या क्रीडा प्रबाेधनीतील प्रतिभावंत बाॅक्सर अनंता चाेपडेने आणुन दिला. त्याने प्रचंड इंडाेनेशिया येथील प्रेसिंडेट चषक बाॅक्सिंग स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. त्याने पुरुषांच्या ५२ किलाे वजन गटात गाेल्डन पंच मारला. यासह त्याने  भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. बुलढाणा जिल्ह्यातील सवणा गावात वडिल प्रल्हाद  चाेपडे यांना शेतात मदत करत त्याने बाॅक्सिंगचे  धडे गिरवले. यातील आपली प्रतिभा कायम  ठेवताना त्याने हा एेतिहासिक यशाचा पल्ला गाठत सुवर्ण पदक मिळवले. 


आता ऑलिम्पिकसाठीचे  टार्गेट : प्रेसिंडेट कपमधील सुवर्णपदकाने माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागाचे माझे स्वप्न आहे. याच्या पुर्तीचा मला विश्वास आहे. त्यासाठी लागणारी प्रचंड मेहनत मी घेत आहे. आतापर्यंतच्या मेहनतीच्या बळावर मला इंडाेनेशियातील ही स्पर्धा गाजवता आली. साेनेरी यशाची हीच लय आगामी स्पर्धांमध्येही कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल,अशी प्रतिक्रिया चॅम्पियन अनंताने विजयानंतर दिली.

 

दाेन बाऊटमध्ये सरस : अनंता चाेपडेने प्रेसिंडेट कप बाॅक्सिंग स्पर्धेच्या सलग दाेन बाऊटमध्ये सरस खेळीवर  एकतर्फी विजयाची नाेंद केली. सेमीफायनल, फायनलची बाऊट युनिमस डिसिझनच्या आधारे जिंकली. त्याला तिन्ही पंचांनी  सारखेच गुण दिले . त्यामुळे त्याने ५-० ने विजयाची नाेंद केली आहे.
 

प्रेसिंडेट चषक बाॅक्सिंग स्पर्धा पहिला महाराष्ट्रीय बाॅक्सर 
प्रेसिंडेट चषक बाॅक्सिंग स्पर्धेतील याच पदकाच्या बळावर अनंताने महाराष्ट्राच्या  बाॅक्सिंगमध्ये एेतिहासिक यशाची नाेंद केली. या स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकणारा अनंता हा महाराष्ट्राचा पहिलाच बाॅक्सर ठरला.  मेहनतीने त्याने या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले हाेते. त्याचा करिअरमधील प्रेसिंडेट चषक स्पर्धेतील पहिलाच सहभाग हाेता. याच पर्दापणातील स्पर्धेमध्ये त्याने फायनलपर्यंत धडक मारली.


त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले  
अनंता  या प्रतिभावान बाॅक्सरकडून भविष्यात साेनेरी यशाच्या आशा आहेत.  गरीब घरातील असलेला हा बाॅक्सर प्रचंड मेहनती आहे. याच मेहनतीचे  फळ त्याला या स्पर्धेत मिळाले आहे. भारतीय संघात स्थान मिळवून त्याने या माेठ्या स्पर्धेमध्ये आपली क्षमता  सिद्ध केली. त्याची ही चॅम्पियनशिप ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना प्राेत्साहन देणारी आहे.
सतीष भट, प्रशिक्षक, क्रीडा प्रबाेधनी

बातम्या आणखी आहेत...