आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ancient Indian Knowledge Needs To Be Linked To Modernity For The Treatment Of Serious Ailments : Modi

गंभीर आजारातील उपचारासाठी प्राचीन भारतीय ज्ञानाला आधुनिकतेशी जाेडण्याची गरज : माेदी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींच्या हस्ते मुंबईतील योगा इन्स्टिट्यूटच्या संचालिका हंसा योगेंद्र यांना योग पुरस्काराने गौरवण्यात आले. - Divya Marathi
मोदींच्या हस्ते मुंबईतील योगा इन्स्टिट्यूटच्या संचालिका हंसा योगेंद्र यांना योग पुरस्काराने गौरवण्यात आले.

नवी दिल्ली : भारताला ५ लाख काेटी रुपयांची अर्थव्यवस्था करण्यात आयुषचे महत्त्वपूर्ण याेगदान राहील. याेगानंतर आता आयुषला जगाच्या कानाकाेपऱ्यात पाेहाेचवायचे आहे. हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु त्यासाठी त्याला वैज्ञानिक भाषेत सादर करणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शुक्रवारी सांगितले. 


देश गंभीर आजारावरील उपचाराबद्दल हजाराे वर्षांपासून खूप काही लिहून ठेवण्यात आले हाेते. त्याचे साहित्यही खूप समृद्ध आहे. म्हणूनच आता त्याला आधुनिकतेशी जाेडण्याची गरज आहे, असे माेदी म्हणाले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात शुक्रवारी आयाेजित आयुष मंत्रालयाच्या याेग पुरस्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते. आता लेह-लदाखचा साेवाह रिग्पा देखील आयुष परिवाराचा सहावा सदस्य बनला आहे. त्यासाठी लदाखमध्ये एका आंतरराष्ट्रीय संसाेधन केंद्राची स्थापना केली जाणार आहे.माेदी म्हणाले, आयुष्यमान भारत याेजनेच्या अंतर्गत देशभरात दीड लाख आराेग्य केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्यापैकी १२ हजार ५०० आयुष केंद्र असतील. हरियाणात १० आयुष केंद्र सुरु झाले आहेत. सरकारचे उद्दिष्ट या वर्षाखेरीस चार हजार केंद्र सुरु करण्याचे आहे. 
पंतप्रधानांच्या हस्ते १९ व २० व्या शतकातील १२ आयुष्य चिकित्सकांच्या स्मृतीवर आधारित डाक तिकिटांना जारी करण्यात आले. माेदींनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या साह्याने हरियाणातील १० आयुष आराेग्य केंद्रांचा शुभारंभ केला. हे केंद्र अंबाला, करनाल, फरिदाबाद, साेनीपत, गुरूग्राम, कॅथल, मेवात, हिसार, जिंद, पंचुकला जिल्ह्यात हे केंद्र सुरू केले आहेत. 


'नव्या भारतात आडनावाने फरक पडत नाही' 
नवीन भारतात तरुणांना आडनावाने फरक पडत नाही. आपले नाव व्हावे यासाठी क्षमता सिद्ध करणे गरजेचे असते, असे पंतप्रधान माेदी यांनी सांगितले. यश माेठे घराणे, माेठे शहर किंवा संस्थानावर अवलंबन नाही, असे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...