आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकैरो- इजिप्तमध्ये एका प्रेग्नेंट महिलेचा सांगाडा सांपडला असून त्यातून समोर आलेल्या तथ्यांनी शास्त्रज्ञांना धक्का बसला आहे. अंदाजे 3700 वर्षे जुन्या या सांगाड्यात महिलेच्या पोटातील बाळाचा सांगाडाही पण स्पष्ट दिसत आहे. शास्त्रज्ञांना आधी वाटले की, हा महिलेच्या शरिराचाच भाग आहे. पण नंतर तो पोटातील बाळाचा सांगाडा असल्याचे समोर आले.
येल युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ बोलोग्नाच्या शास्त्रज्ञांना इजिप्तच्या कैरो शहरापासून 852 किमी अंतरावर हे सांगाडे मिळाले आहेत. पुरातत्व विभागाच्या मुस्तफा वजीरी यांनी म्हटले आहे की, ही जागा इसवीसनपूर्व 1750 मधील बंजारा समाजाचे कब्रस्तान असावी.
पोटातल्या मुलामुळे समोर आले मृत्युचे कारण
- पोटातील बाळाचा सांगाडा पूर्ण विकसित बाळाचा होता. म्हणजे डिलिव्हिरीच्या काळाच्या जवळपास महिलेचा मृत्यू झाला असावा. म्हणजे प्रसुती वेदनांमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
हाड तुटल्यामुळे मृत्यू
- महिलेच्या कंबरेचे हाड तुटल्याचे शास्त्रज्ञांना दिसले. ते नीट जोडलेले नसल्याने डिलिव्हरीच्या वेळी महिलेचा मृत्यू झाला.
चामड्यात गुंडाळलेले होते शरीर
- आसपासच्या वस्तू पाहून समजले की, महिलेला दफन करताना प्राण्याच्या चामड्यात तिला गुंडाळून ठेवलेले होते. त्यासोबतच तिच्याजवळ नक्षीकाम केलेले भांडे आणि ऑस्ट्रिचचे अंडेही ठेवलेले होते. ते सामान तिच्या सन्मानासाठी ठेवले असावे असे सांगितले जात आहे.
- याआधीही याठिकाणी 4500 वर्ष जुने भांडे आणि त्यांना बनवण्याचे साहित्य सापडले आहे. तो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा शोध मानला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.