आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्र प्रदेशात जगनमोहन यांचे पारडे जड; जनसेनेमुळे टीडीपीच्या मतांवर परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम- नौदलाचे तळ आणि स्टील प्लँटमुळे विशाखापट्टणमची ओळख आहे. परंतु विशाखापट्टणमपासून ८० किलोमीटर लांब अलकापल्ली जिल्ह्यातील मनक्का गावातील महालक्ष्मी नायडू यांच्या घरापर्यंत विकास पोहोचला नाहीच. त्यांचा परिवार एक दशकापासून गूळ बनवतो. तापणाऱ्या भट्टीसमोर दिवसभरात संपूर्ण परिवार १०० किलो गूळ तयार करतो. हा गूळ गावात ३५ ते ४० रुपये किलोने विकला जातो. परंतु शहरात त्याचा  दर ६० ते ७० रुपये प्रतिकिलो असतो. त्यांच्या मेहनतीपुढे नफा किरकोळ आहे. त्यांच्या डोळ्यात व तोंडावरही नाराजी दिसते. यंदा जगनमोहन रेड्डी यांना संधी देण्याची चर्चा चालली आहे. अराकू, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, अनाकापल्ली, काकीनाडा, अमलापुरम, राजहंडरी, नरसापुरम व एलुरू क्षेत्रात एकदा जगनमोहन यांना संधी देण्याची चर्चा आहे.  


आंध्र प्रदेशातील उत्तर भाग समजून घेण्यासाठी अनाकापल्लीतील राजकीय विश्लेषक बालू गाडी यांच्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, ‘जगन यांनी येथे घोषणा दिली आहे. ‘कावाली जगन रावाली जगन’ म्हणजे जगन होणार, जगर येणार. या घोषणेचा परिणाम दिसत आहे. टीडीपी भाजप यांची युती तुटल्यानंतर वायएसआर यांनी जगन यांना एकदा संधी देण्याचा रणनीतीवर काम सुरू केले.’  उत्तर भाग कोपू मतदारांमुळे वायएसआर यांचा बालेकिल्ला आहे. तसेच कोपू मतदार निर्णायक आहे. कोपू जातीत थुर्प कोपू मतदारही ओबीसीत आहे. हे जवळपास ४० % आहेत. हे वायएसआरचे मतदार समजले जातात. या समाजाचा एक भाग सामान्य वर्गात येतो. यांना बलिजर कोपू, तेलगा कोपू नावाने ओळखले जाते. हे पवन कल्याण यांच्या जनसेनेचे मतदार समजले जातात. म्हणजेच एकूण कोपू मतदारांची संख्या ६० टक्के आहे. पवन कल्याण तेलुगू सिनेस्टार चिरंजीव यांचे भाऊ आहेत. मागील वेळेस टीडीपी व भाजप यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. त्यावेळी पवन कल्याण यांनी प्रचार केला होता. आता पवन कल्याण आपल्या जनसेना पार्टीसोबत  लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. भाजप व टीडीपीसुद्धा वेगवेगळे लढत आहेत. त्याचा फटका टीडीपीला बसण्याची शक्यता आहे. जनसेना टीडीपीचे मत कमी करेल. तसेच दलित मतदार सरळ वायएसआर यांच्यासोबत असतील. निवडणुकीची बदललेली हवा पाहता १० टीडीपी खासदारांपैकी तीन मुत्तासेट्टी श्रीनिवास रॉय, पंडूला रवींद्र बाबू, थोटा नरसिंहा यांनी वायएसआरमध्ये प्रवेश केला आहे. नरसापुरमचे भाजप खासदार एम गोकंतंरन गंगा राजू यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. प्रचारात जगनमोहन यांनी सामान्य कोपू यांना ओबीसी दर्जा देण्यास नकार दिल्याचा फटका त्यांना बसेल.   


एक दशकापासून राजकीय पत्रकारिता करणारे विशाखापट्टणमचे पत्रकार एन मधू सुंदनराव यांनी सांगितले की, एकदा चंद्राबाबू यांना संधी देऊन पाहिली. परंतु ते यशस्वी झाले नाहीत. डॅमेज कंट्रोल म्हणून त्यांनी केंद्रातील भाजपचा पाठिंबा काढला. त्याचा फायदा वायएसआर घेत आहे. यामुळे टीडीपी नेता वायएसआरमध्ये जात आहेत.’    


अराकू राखीव मतदारसंघ आहे. येथे कोपू जातीचे २५ टक्के मतदार आहेत.  सध्या येथे वायएसआर मजबूत दिसत आहे. कारण पवन कल्याण जनसेनेसोबत आहे. यामुळे टीडीपीस कोपू मतदान मिळणार नाही. तसेच १९६७ चा अपवाद वगळात श्रीकाकुलमम जागा नेहमी टीडीपी किंवा काँग्रेसकडेच राहिली आहे. १९६७ मध्ये स्वतंत्र पार्टीच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. टीडीपीचा बालेकिल्ला असणाऱ्या या जागेवर शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. ३० टक्के मते शेतकऱ्यांची आहेत.  विशाखापट्टणम व विजयनगरम मतदारसंघाचा इतिहास संमिश्र राहिला आहे. दोन्ही ठिकाणी शहरी मतदार जास्त आहेत. भाजप-टीडीपी युतीने मागील वेळेस विजय मिळवला होता. या वेळी वातावरण वेगळे आहे. भाजपशी युती करून टीडीपीने चूक केली, हा संदेश देण्यात वायएसआर यशस्वी ठरला आहे. विशाखापट्टणममध्ये अवैध जागा बळकावण्याचा प्रश्नही नाजूक आहे. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, २० हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर अवैध कब्जा केला गेला आहे. यासंदर्भात निदर्शनेही झाली. या नाराजीचा फायदा वायएसआरला मिळू शकतो. अनाकापल्लीमध्ये कोणताही प्रादेशिक मुद्दा नाही. परंतु  टीडीपी खासदार  मुत्तासेट्टी श्रीनिवास रॉय वायएसआरमध्ये गेले आहेत. हे खासदार कोपू समाजाचे आहेत. यामुळे कोपू मतदार टीडीपीपासून लांब जाऊ शकतात.  

 
काकीनाडा व अमलापुरम येथील वातावरण एकसारखेच आहे. दोन्ही जागा मागील वेळेस टीडीपीने जिंकल्या होत्या. हे दोन्ही खासदार वायएसआरमध्ये गेले आहेत. गोदावरीच्या किनाऱ्यावर राजहंडरी जागा आहे. नदीकिनाऱ्यावर शहर असून पाण्याचा मोठा मुद्दा आहे. पाच वर्षांत टीडीपी आश्वासन पूर्ण करू शकली नाही. वायएसआर हाच मुद्दा प्रचारात मांडत आहे. नरसापुरम व एलुरू मतदारसंघात मागील वेळेस भाजप व टीडीपी सोबत होते. नरसापुरममध्ये भाजप तर एलुरुत टीडीपी विजयी झाले होते. यंदा नरसापुरमहून उद्योगपती रघुराज रामन वायएसआरचे उमेदवार आहेत. येथे ३० % मते थिरपू कोपू समाजाची आहेत. त्याचा फायदा वायएसआरला मिळणार आहे. एलुरूमध्येही वायएसआरला कोपू समाजाचे मतदान मिळेल.  \\ उत्तर आंध्र म्हणजेच उत्तरांदाचा प्रवास पूर्ण करून बिलासपूरहून येणाऱ्या रेल्वेने (क्रमांक १७४८१, रायपूर तिरुपती बिलास एक्सप्रेस) विजयवाडाकडे निघालो. रेल्वेत काकीनाडाचे संपत राव भेटले. आयटी व्यावसायिक संपतने वातावरण सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ‘चंद्राबाबू यांनी चांगले काम केले असले, तरीही यंदा वायएसआर यांना संधी देण्याचा विचार होत आहे. नोटबंदीमुळे येथे सर्वाधिक नुकसान झाले. यामुळे कदाचित मोदी यांना मते मिळणार नाहीत.’  

 

मुद्दे : स्थानिक मुद्द्यांशिवाय फक्त दोनच मुद्दे प्रभावी आहेत. पहिला चंद्राबाबू नायडू राज्याच्या विकासासाठी भाजपची साथ सोडल्याचे सांगत आहे,दुसरा वायएसआरचे जगनमोहन रेड्डी एकदा संधी देण्याचे आवाहन करत आहेत.

 

आघाडी :  लढत बहुरंगी आहे. टीडीपी व भाजप यंदा वेगळ्या आहेत. टीडीपी व काँग्रेस एक-दुसऱ्यांना सपोर्ट करू शकते. निवडणुकीनंतर वायएसआर व भाजपसोबत येण्याची शक्यता आहे. जनसेना, बीएसपी व सीपीआय आघाडी टीडीपीची मते कमी करतील. 

 

जातीय समीकरण: सामान्य वर्गातील कोपू समाजाचे मतदान जनसेनेला मिळेल. मागील वर्षी हे टीडीपी-भाजप युतीला मिळाले होते. यंदा या मतांची विभागणी होईल. मागास कोपू समाज व दलित मते वायएसआरकडे जातील.
 

बातम्या आणखी आहेत...