आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्र प्रदेशात पुन्हा ऑनर किलिंग: दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीचा बापाने गळा आवळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयवाडा - आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यात एका वडिलांनी आपल्याच मुलीचा खून केला. आपली मुलगी तिच्या वर्गातील दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम करत आहे अशी माहिती आरोपीला मिळाली होती. याच संतापात त्याने आपल्या 20 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला आहे. यानंतर नातेवाइकांना खोटी माहिती देत आपल्या मुलीला हृदयविकाराचा झटका बसल्याचे सोंग केले होते.


प्रकाशम जिल्ह्यातील कोट्टापेलम गावात राहणाऱ्या के. वेंका रेड्डी याने आपली मुलगी वैष्वणी (20) चा सोमवारी गळा आवळून खून केला. यानंतर नातेवाइकांना वैष्णवीचा मृत्यू झाल्याची माहिती फोनवरून दिली. त्यांनी कारण विचारले असता तिला हृदयविकाराचा धक्का बसला होता असे सोंग रेड्डीने रचले. परंतु, नातेवाइकांना संशय आला आणि त्यांनी वेळीच पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी शवविच्छेदन केले असता तिचा खून झाल्याचे सत्य समोर आले.

 

बी.कॉम सेकंड इयरला शिकत होती वैष्णवी
वैष्णवी येथील एका खासगी महाविद्यालयात बी.कॉम सेकंड इयरला शिकत होती. याच दरम्यान वैष्णवी आपल्या वर्गातील एका मित्राच्या प्रेमात पडली होती. गेल्या दोन वर्षांपासून दोघांची मैत्री होती. 8 महिन्यांपूर्वी वैष्णवीच्या कुटुंबियांना यासंदर्भातील माहिती मिळाली. मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी वैष्णवीवर विविध प्रकारची बंधने लागू केली होती.


पळून गेल्यानंतर आणले होते घरी...
पोलिसांनी केलेल्या तपासात वैष्णवी 2 फेब्रुवारी रोजी आपल्या घरातून पसार झाली होती. तसेच आपल्या प्रियकरासोबत विवाह करण्याच्या हेतूने मरकापुरम जिल्ह्यात पोहोचली. परंतु, तिच्या पालकांनी तिला शोधून काढले आणि परत घरात आणले. या दरम्यान रेड्डी आणि वैष्णवी यांच्या शाब्दिक भांडण झाले आणि रागाच्या भरात रेड्डीने आपल्या मुलीचा गळा आवळला. प्रकाशम जिल्ह्यात ऑनर किलिंगची ही चौथी घटना आहे.

बातम्या आणखी आहेत...