Election / 30 मे रोजी विजयवाडामध्ये शपथ घेणार जगन मोहन रेड्डी, शपथविधीचं पहिलं निमंत्रण मोदींना


भाजपने 250 जागा जिंकल्या असत्या, तर परिस्थिती वेगळी असती- रेड्डी

दिव्य मराठी वेब टीम

May 26,2019 05:38:00 PM IST

नवी दिल्ली- वायएसआर काँग्रेस चीफ वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. रेड्डीं 30 मे रोजी विजयवाडामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या भेटीनंतर जेव्हा रेड्डींना आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल का नाही, याबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले- "आता परिस्थिती बदलली आहे. जर भाजपने 250 किंवा त्यापेक्षा कमी जागा जिंकल्या असत्या तर या अटीवर त्यांना समर्थन दिले असते." त्यांनी निवडणुकीच्या आधीच स्पष्ट केले होते की, जो पक्ष आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त करून देईल त्याच पक्षाला आमचे समर्थन असेल.


भाजपने 250 जागा जिंकल्या असत्या, तर परिस्थिती वेगळी असती- रेड्डी
रेड्डी म्हणाले- "जर भाजपला 250 किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या, तेव्हा आम्हाला केंद्र सरकारवर जास्त अवलंबुन राहण्याची गरज नव्हती. पण आता त्यांना आमची गरज नाहीये. आम्ही जे करू शकत होतोत, ते केले. आम्ही मोंदींना आमची परिस्थिती सांगितली आहे. जर ते फक्त 250 जागेवर विजयी झाले असते, तर परिस्थिती वेगळी असती. तेव्हा आम्ही आंध्राला विशेष राज्याचा दर्जा दिल्यावरच त्यांना समर्थन दिले असते.


एनडीए सरकारला बाहेरून पांठिबा देऊ शकतात रेड्डी
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगन यांनी मोदी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्यावर चर्चा केली आहे. रेड्डी यांनी अमित शाह यांची भेट घेऊन आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून समर्थन मागितले. यादरम्यान वायएसआर काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व्ही. विजय साई रेड्डीदेखील उपस्थित होते.


वायएसआरने 22 लोकसभा जागा जिंकल्या
वायएसआर काँग्रेसने जगनमोहन यांच्या नेतृत्वात राज्यात 25 पैकी 22 लोकसभा जागा जिंकल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 175 पैकी 151 जागेवर विजय मिळवला आहे. एनडीएमधून वेगळे होऊन निवडणूक लढवत असलेल्या चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाने विधानसभेत फक्त 23 जागा मिळवल्या.

X
COMMENT