आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी नायडू यांनी 'धर्म पोरता दीक्षा' आंदोलन सुरू केले. या वेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी राजधर्माचे पालन केले नाही. येत्या निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना धडा शिकवेल. आंध्र प्रवेशासंदर्भात त्यांनी नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे.
सोमवारी महात्मा गांधींच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करून आंध्र भवनात आंदोलन सुरू केले. या वेळी त्यांच्यासोबत राज्यातील मंत्री व खासदारही होते. नायडू यांनी म्हटले की, २०१४ मध्ये राज्याचे विभाजन करताना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आली नाहीत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ मधील गुजरात दंगल संदर्भात मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही, असे म्हटले होते. आता आंध्र प्रवेशासंदर्भात त्यांनी राज्य धर्माचे पालन केले नाही. आंध्र प्रदेश सरकार केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी दिल्लीत येत असताना मोदींना गुंटूरमध्ये जाण्याची गरज काय? असा प्रश्न नायडू यांनी उपस्थित केला.
चंद्राबाबू नायडूंच्या आंदोलनात राहुल गांधी यांचा सहभाग
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन धरणे आंदोलनात सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रफाल विमान करारात उद्योगपती अनिल अंबानी यांना फायदा मिळवून दिल्याचा आरोप राहुल यांनी केला. या वेळी राहुल म्हणाले, मी आंध्र प्रदेशातील लोकांच्या सोबत आहे. मोदी यांनी राज्यातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. ते जेथेही जातात खोटेच बोलतात. जनतेमध्ये त्यांची विश्वासार्हता काहीच राहिली नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.