Home | National | Delhi | andhrapradesh cm chandrababu naidu met sharad pawar in delhi

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतली शरद पवारांची भेट, 23 मे नंतरच्या मोर्चे बांधणीला सुरुवात

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 18, 2019, 02:06 PM IST

नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीने विशेष राज्याच्या दर्जावरुन भाजपची साथ सोडली आहे

 • andhrapradesh cm chandrababu naidu met sharad pawar in delhi

  नवी दिल्ली- लोकसभेच्या निकालापूर्वीच राजकारण्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. यातच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू झालीये. चंद्रबाबू नायडू यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. चंद्राबाबूंच्या या भेटीगाठी म्हणजे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीने विशेष राज्याच्या दर्जावरुन भाजपची साथ सोडली. सध्या ते यूपीएच्या नेत्यांसोबत दिसतात.


  दरम्यान, चंद्राबाबू नायडूंनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशातील सपा नेते अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती यांच्याही भेट घेणार आहेत. चंद्राबाबू नायडू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर लखनऊकडे रवाना झाले. तिथे ते मायावती आणि अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत.


  23 मे रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. एकंदरीत ही सर्व स्थिती पाहता विरोधकांनी निकालापूर्वीच सत्तास्थापनेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केल्याचे चित्र आहे.


  पुन्हा मोदी सरकार- अमित शाह
  दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा दावा केला आहे. अमित शाह यांनी काल पत्रकार परिषद घेतली, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच वर्षात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत पाहायला मिळाले. मोदींनी आपले मत व्यक्त केले पण पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना अमित शाहांनीच उत्तरे दिली.

Trending