Home | National | Other State | AndhraPradesh: women will not wear nighties from 7am-7pm

भारतात 'या' ठिकाणी आहे महिलांना 'नाईटी' घालण्यास बंदी, नाईटी घातल्यास भरावा लागतो इतका दंड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 06:44 PM IST

'नाईटी' घालणाऱ्या महिलेची माहिती देणाऱ्यास मिळते बक्षीस

 • AndhraPradesh: women will not wear nighties from 7am-7pm

  नॅशनल डेस्क/ हैदराबाद : पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात महिलांनी गेल्या नऊ महिन्यांपासून दिवसा नाईटी घालणे बंद केले आहे. कारण गावातील वृद्ध लोकांनी येथील महिलांना दिवसा नाईटी घालण्यास मनाई केली आहे. वृद्धांचे म्हणणे आहे की, नाईटी फक्त रात्री घालण्यासाठी असते. जर एखाद्या महिलेने या नियमाचे पालन केले नाही तर तिला 2000 रुपये दंड भरावा लागतो.


  सोशल मीडियावर व्हायरल झाले प्रकरण
  नऊ महिन्यांपासून टोकलापल्ली गावात नाईटीवर बंदी घालण्यात आली आहे. पण महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी गावात भेट दिल्यानंतर गुरुवारी सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाले. या गावात एकूण 1800 महिला आहेत. गावातील वृद्धांच्या 9 सदस्यीय समितीने हा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन योजना तयार केली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 दरम्यान नाईटी घालणाऱ्या महिलेबद्दल माहिती देणाऱ्या दुसऱ्या महिलेस बक्षीस म्हणुन 1000 रुपये देण्यात येतात.

  > समितीचे म्हणणे आहे की, वसुल झालेली दंडांची रक्कम गावाच्या विकास कामावर खर्च केली जाते. या निर्णयाला गावातील कोणत्याही स्त्रीचा विरोध नसल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  > गावातील महिलेचे म्हणणे की, आम्ही या आदेशामुळे खूप आनंदी आहोत. आम्ही सर्वांनी आमच्या परंपरेचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

  > तर गावातील दुसरी महिला म्हणते की, सर्व महिलांनी एकत्रितपणे दिवसा नाईटी न घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आमच्या निर्णयाबद्दल वृद्धांना सांगितले. वृद्धांनी नाईटी घालण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित केली आहे. परंतु नियमाचे उल्लंघन केल्यास कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही.

Trending