आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा धूपिया लग्नापुर्वीच झाली होती प्रेग्नेंट, पतीने पहिल्यांदाच केले मान्य, म्हणाला - घरच्यांना सांगितल्यावर खुप चिडले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. नेहा धूपियाचा पती अंगद बेदीने आपल्या आयुष्यातील अनेक सीक्रेट्सचा खुलासा पत्नीच्याच चॅट शोमध्ये केला. नेहाच्या 'नो फिल्टर नेहा' चॅट शोमध्ये पती अंगदने खुलासा केला की, नेहा लग्नापुर्वीच प्रेग्नेंट होती. नेहाने शोचा प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

नेहा अंगदने घाईघाईत केले होते लग्न 
- नेहाच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना अंगद म्हणाला की- त्याने नेहा प्रेग्नेंट आहे हे घरी सांगितल्यावर घरच्या लोकांनी खुप सुनावले आहे. हे ऐकूण नेहा गप्प बसते. नेहा लग्नापुर्वीच प्रेग्नेंट होती हे अंगदने पहिल्यांदाच मान्य केले.
- नेहाने आपल्या शोमध्ये पतीचे काही सीक्रेट शेअर केले. हे ऐकून अंगद शॉक्ड झाला. नेहाने शोमध्ये सांगितले की, तु तुझ्या गर्लफ्रेंडसोबत तिच्या फ्लॅटमध्ये राहत होता आणि तिने तुझे सामान रस्त्यावर फेकले होते. उत्तर देताना अंगद म्हणाला की, - तुला हे सर्व कसे माहिती?

 

मेमध्ये अंगद-नेहाने केले होते लग्न 
नेहा आणि अंगदने याचवर्षी मेमध्ये लग्न केले. या दोघांनी घाईघाईत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे वृत्त ऐकूण सर्वच शॉक्ड राहिले होते. नेहा प्रेग्नेंट असल्यामुळे त्यांनी तात्काळ लग्न केले, या बातम्या यापुर्वीच आल्या होत्या. पण त्यावेळी या दोघांनी हे सर्व नाकारले होते.
- ऑगस्ट महिन्यामध्ये या दोघांनी नेहा प्रेग्नेंट असल्याचे जाहिर केले. नेहाने एका मुलाखतीत तिने प्रेग्नेंसीचे वृत्त का लपवले हे सांगितले होते. नेहा म्हणाली होती की, 'माझ्या प्रेग्नेंसीच्या वृत्तामुळे मला करिअरमध्ये नुकसान होईल अशी मला भिती होती. यामुळे मी हे वृत्त लपवून ठेवले. माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या 6 महिन्यात माझे बेबी बंप स्पष्ट दिसत नव्हते. यामुळे मला फायदा झाला.'
- नेहाने मुलाखती दरम्यान सांगितले की, तिची एनर्जी लेव्हल खुप जास्त आहे. तिने या दरम्यान 'हेलिकॉप्टर ईला' आणि 'स्टाइल बाय नेहा' या चित्रपटांची शूटिंग पुर्ण केली. नेहा म्हणाली की, तिला मॅटरनिटी लिव्ह घ्यायची नाही. ती महिलांच्या मॅटरनिटी लिव्हच्या विरुध्द आहे असा त्याचा अर्थ होत नाही, तर ही तिची चॉइस आहे असे ती म्हणाली.

 

1 वर्षांच्या डेटिंगनंतर नेहा-अंगदने केले लग्न 
नेहा आणि अंगद 2017 मध्ये क्रिकेटर जहीर खान आणि सागरिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले होते, तेव्हापासून त्यांच्या चर्चा सुरु झाल्या. दोघांच्या लव्ह लाइफच्या बातम्या पहिल्यापासूनच येत होत्या. पण जहीर-सागरिकाच्या रिसेप्शनंतर दोघं नेहमीच एकत्र दिसत होते. हे पार्टीमध्ये आणि डिनरसाठीही एकत्र दिसत होते. 1 वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी लग्न केले.
 

बातम्या आणखी आहेत...