आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांगराच्या फाळाने डोक्यात वार करून अंगणवाडी सेविकेची निर्घृण हत्या, 8 वर्षीय मुलाचेही डोळे फोडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव- खानापूर तालुक्यातील गुंडेनहट्टी येथे डोक्यात वार करून अंगणवाडी सेविकेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर मारेकर्‍यांनी  अंगणवाडी सेविकेच्या आठ वर्षीय मुलाचे डोळे फोडण्यात आले आहेत. सोमवारी ही घटना समोर आली.

 

जयश्री कल्लाप्पा बेळगावकर (वय-40) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या हल्ल्यात अनुराग गंभीर जखमी झशला असून त्याचा एक डोळा कायमस्वरुपी निकामी झाला आहे. कौटुंबीक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बैलूर येथील रहिवासी जयश्री कल्लाप्पा बेळगावकर यांनी घटस्फोट घेतला होता. त्या मागील 10 वर्षांपासून गुंडेहट्टी येथे माहेरी राहत होत्या. अंगणवाडी सेविका म्हणून त्या काम करीत उदरनिर्वाह चालवित होत्या. जयश्री यांचे वडील आणि भावाशी मांडण झाल्यामुळे गुंडेहट्टी येथून जवळच असलेल्या शेतवडीत त्या आपल्या मुलासोबत राहत होत्या. अज्ञात मारेकर्‍यांनी घरावरील कौले काढून घरात प्रवेश केला. जयश्री यांच्या डोक्यात नांगराच्या फाळाने वार केला. यात जयश्री यांचा जागेवरच मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी अनुराग याच्याहीवर हल्ला केला. त्याचे डोळी फोडले. अनुराग रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना मारेकर्‍यांनी तेथून पळ काढला. सोमवारी सकाळी शेतमालक नेहमीप्रमाणे म्हशीचे दूध काढण्यासाठी आला असता त्याला हा प्रकार दिसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनुराग दिसताच त्याने गावकर्‍यांना घटनेची माहिती दिली. अनुराग याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला आहे. नंदगड पोलिसांनी जयश्री यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...