आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली पोलिसांचा संताप; धरणे आंदोलन, घोषणाबाजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : तीस हजार कोर्टात वकिलांच्या आंदोलनादरम्यान अनेक पोलिसांना मारहाण झाली. मात्र, या प्रकरणानंतर प्रशासनाने पोलिसांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी दिल्ली पोलिसांनीच आपल्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. हे जवान इतके भडकले होते की, पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी शांत राहण्याच्या तसेच कामावर परतण्याच्या केलेल्या आवाहनालाही या जवानांनी जुमानले नाही. एकीकडे जवान पोलिस मुख्यालयासमोर धरणे धरण्यासाठी एकत्र जमले असताना या जवानांचे कुटुंबीय पण रस्त्यावर उतरले. या नातेवाईकांनी इंडिया गेटच्या दिशेने मोर्चा काढला. सहा ठिकाणी रास्ता राेको केला.

किरण बेदींची आठवण
दिल्ली पोलिसांना १७ फेब्रुवारी १९८८ च्या प्रकरणाची आठवण झाली. त्या पोलिस उपायुक्त असताना पोलिस व वकिलांत असाच वाद पेटला तेव्हा बेदींनी लाठीमार करण्याचे आदेश दिले होते. जवानांनी या वेळी बेदींचा जयजयकार केला.

प्रकरण काय : शनिवारी तीस हजारी कोर्टात पार्किंगवरून पोलिस व वकीलात हाणामारी झाली. नंतर जवानांना वकिलांनी मारहाण केली. मात्र, याची दखल घेतली गेली नव्हती.


काळा कोट गुन्हेगार, मग खाकी बदनाम का?', अशा घोषणा देत, किती वेळ मार खाल्ल्यावर पोलिसांनी कारवाई करायची ते हायकोर्टाने ठरवावे, अशी मागणी पोलिसांनी केली.

 

बातम्या आणखी आहेत...