आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांशी भिडून वाचवले मालकाचे 80 लाख, अन् मिळाले असे Gift की रागात 70 लाख घेऊन फरार झाला कर्मचारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एका कर्मचाऱ्याने आपल्या मालकाचे 80 लाख रुपये वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकला. मोठ्या धाडसाने त्याने चोरांना झुंज देऊन मालकाचे पैसे वाचवले होते. परंतु, मालकाने त्या बदल्यात आपल्या कर्मचाऱ्याला फक्त एक टी-शर्ट गिफ्ट दिली. यावरच संबंधित कर्मचारी इतका संतापला की त्याने मालकाविरुद्ध कट रचला. एका क्लाइंटकडून तो मालकाचे 70 लाख रुपये घेऊन फरार झाला आहे. मॉडल टाउन परिसरात घडलेल्या या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 लाख रुपये कॅश, बँक खात्यात जमा केलेले 3 लाख रुपये आणि कार जप्त केली. सोबतच, मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. 


मालकावर नाराजीनंतर रचला कट...
- अतिरिक्त पोलिस आयुक्त (क्राइम ब्रांच) राजीव रंजन यांनी सांगितले, की 27 ऑगस्ट रोजी रीमा पॉलीचेम प्राइव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकाने कर्मचारी धनसिंहला एका प्रॉपर्टीतून मिळालेले 70 लाख रुपये आणण्यासाठी पाठवले होते. परंतु, तो पैसे घेऊन परतलाच नाही. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी 21 सप्टेंबर रोजी याकूब हसन (37) या एका संशयिताला ताब्यात घेतले. तो मुख्य आरोपी धनसिंहचा मित्र आहे. चौकशीमध्ये त्याने धनसिंहला तीन मुली असून तो त्यांच्या लग्नाची तयारी करत आहे असे सांगितले. 
- या घटनेच्या काही दिवसांपूर्वी मालकाचा सर्वात विश्वासू असलेला धनसिंह 80 लाख रुपये घेऊन कंपनीला येत होता. त्याचवेळी, वाटेत चोरट्यांनी त्याला अडवून रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपल्या जीवाची बाजी लावून धनसिंह चोरट्यांशी भिडला आणि मालकाला 80 लाख रुपये सुखरूप आणून दिले. या घटनेत तो जखमी झाला होता. मालकाने यावर खुश होऊन धनसिंहला फक्त एक टीशर्ट दिले होते. त्यावरच नाराज झाल्यानंतर त्याने हा कट रचला. 


मित्राला बनवले क्राइम पार्टनर
70 लाख रुपये घेतल्यानंतर धनसिंहने मित्र याकूबला कॉल केला. यानंतर दोघे कारने नैनितालला गेले. धनसिंहला सोडल्यानंतर याकूब दिल्लीत परतला. धनसिंहने या बदल्यात त्याला 4 लाख रुपये दिले होते. सोबत आणखी पैसे देणार असे आश्वस्त केले होते. याकूबने दिल्लीत आल्यानंतर धनसिंहच्या बाइकचे तुकडे केले आणि ते भंगारात विकले. याच दरम्यान पोलिसांनी याकूबला अटक केली. 

 

बातम्या आणखी आहेत...