आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधूची केली नाही पाठवणी, नवरदेवाने रागाच्या भरात सासऱ्याची केली हत्या; नवरदेवासह सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जालोर - शहरात कोतवाली पोलिस स्टेशन परिसरात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधूनची पाठवणी करण्यास नकार दिल्यामुळे नवरदेवाने रागाच्या भरात नातेवाईकांच्या मदतीने वधू पक्षावर हल्ला केला. या हल्ल्यात वधूच्या पित्याचा मृत्यू झाला. तर आई आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपी नवरदेवासह सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

दुसऱ्या दिवशी विदाई न केल्यामुळे झाला वाद 
कोलतवाल बाघसिंह यांनी सांगितले की, बुधवारी रात्री रामदेव कॉलनी येथील रहिवासी पपीयाने तक्रार दाखल करत सांगतिलेकी, त्याच्या बहिणीचे रणछोड येथील पकाराम भील याच्याशी विवाह झाला होता. सोमवारी वरात आली आणि मंगळवारी धार्मिक रुढी-परंपरेनुसार विवाह पार पडला. यानंतर वर पक्षाने वधूची बुधवारी पाठवणी करण्याबाबत विचारणा केली. पण वधू पक्षाने गुरुवारी पाठवणी करणार असल्याचे सांगितले. यावरून दोन्ही पक्षांमध्ये विवाद झाला. 

 

नातेवाईकांच्या मदतीने वधू पक्षातील लोकांना केली मारहाण
वादानंतर बुधवारी नवरदेव वधूला न घेताच घरी परतला. पण रात्री अंदाजे 10 वाजता त्याने नातेवाईकांच्या साथीने वधू पक्षातील लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यात वधूचे पिता दुदाराम (वय 62वर्षे), आई ढेली व भाऊ पांचाराम जखमी झाले. दुदाराम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी नवरदेव अशोक, सासरा पकाराम, सासू पेपी, नवरदेवाचा मेहूणा सुकाराम, चुलतभाऊ श्रवण, चंपाराम, लाकाराम अमराराम यांच्याविरोधान खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.