आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरचे जेवण घेऊ न दिल्यामुळे कैद्याने पोलिसांवर केला हल्ला, दाताने एका पोलिस कर्माचाऱ्याच्या बोटांचा घेतला जोरदार चावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेनंतर कैद्याने स्वतःचे डोके व्हॅनच्या ग्रीलवर मारले आणि स्वतःलाच जखमी करुन घेतले

ठाणे- 26 वर्षीय अंडरट्रायल कैद्याने घरचे जेवण घेऊ न दिल्यामुळे पोलिसांच्या टीमवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. संबंधित कैद्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीने न्यायालयाच्या परिसरात कैद्याला घरचे जेवण देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तसे करू दिले नाही. त्यानंतर पोलिस त्याला दिंडोशी कोर्टातून ठाणे सेंट्रल जेलमध्ये घेऊन जात असताना हा प्रकार घडला.


कैदी मोहम्मद सोहल शौकत अलीने नौपाडामध्ये एका पेट्रोल पंपाजवळल पोलिस व्हॅनमध्ये बसलेल्या पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिस त्याला दिंडोशी कोर्टातून ठाणे सेंट्रल जेलमध्ये घेऊन जात होते. ठाणे पोलिस विभागाच्या प्रवक्त्या सुखदा नारकरने सांगितले की, अलीला शुक्रवारी सकाळी 11 इतर कैद्यांसोबत कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाबाहेर त्याच्या एका कुटुंबियाने त्याला घरचे जेवण देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी ते पाहीले आणि तो डब्बा परत त्या व्यक्तीकडे दिला.


यामुळे नाराज अलीने नौपाडामध्ये एका पेट्रोल पंपाजवळ व्हॅनमधील पोलिसांना शिवीगाळ करत हल्ला चढवला. त्याने एका पोलिस कर्मचाऱ्यावर थुंकला आणि दुसऱ्याच्या बोटला आपल्या दातांनी चावले. त्यानंतर त्याने स्वतःचे डोके व्हॅनच्या ग्रीलवर मारुन स्वतःला जखमी करुन घेतले. सध्या त्याला सिव्हील हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे.