आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Angry Ranu Mondal Reprimanded The Woman In Front Of Everyone For Demanding A Selfie

फॅनने स्पर्श करुन सेल्फी मागितल्याने भडकली रानू मंडल, व्हिडिओ पाहून नेटक-यांनी रानू मंडलला फटकारले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः एका रात्रीतून स्टार पदावर पोहोचलेल्या रानू मंडल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत एका महिला चाहतीने रानू मंडल यांच्या हाताला स्पर्श करत सेल्फीसाठी विनंती केली होती. त्या महिलेने हाताला स्पर्श करणे रानू यांना आवडले नाही. ‘असा हाताला स्पर्श करुन आवाज का देता? काय आहे हे?’ असे म्हणत रानू यांनी त्या महिलेला सुनावले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी रानू मंडल यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.  

रानू यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी रानू यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीसाठी फटकारले आहे. अनेकांनी रानू यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘ही तर प्रसिद्धीची हवा आहे, शिक्षण हे महत्वाचे असते, तुम्ही अशा कशा वागू शकता अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी रानू यांना सुनावले आहे.

बातम्या आणखी आहेत...