आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त गावकऱ्यांनी आंध्र प्रदेश पोलिसांना कोंडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे एका व्यक्तीस पकडून नेत असताना शेगाव खोडके येथील गावकऱ्यांनी आंध्रप्रदेशातील पोलिसांना कोंडून ठेवल्याची घटना रविवारी घडली आहे. घटनास्थ‍ळावर रिसोडसह गोरेगाव व सेनगाव पोलिस दाखल झाले आहेत.


सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे गणेश गायकवाडला पकडण्यासाठी आंध्र प्रदेशातील पाच जणांचे पथक रविवारी दुपारी दाखल झाले होते. पोलिस गायकवाडला वाहनामध्ये टाकून नेत होते. हा प्रकार परिसरातील गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेगाव खोडके येथे सुमारे पाचशे ते सहाशे जणांच्या जमावाने आंध्र प्रदेश पोलिसांच्या वाहनाला घेराव घालून थांबवले. गावकऱ्यांनी त्यांच्याकडे विचारणा सुरू केली. मात्र पोलिसांना हिंदी भाषा येत नव्हती तर गावकऱ्यांना तेलगू भाषा कळत नव्हती. गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने गावकऱ्यांनी पाच जणांच्या पथकाला शेगाव खोडके येथे एका घरात कोंडून ठेवले. आंध्र प्रदेशातील पोलिस पथक साध्या वेशातील असल्यामुळे जमावाने त्यांच्यावर विश्वास ठेवलाच नाही. सदर प्रकार हिंगोली पोलिसांना कळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बाबूराव जाधव, गोरेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिंदे, तसेच रिसोड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. रात्री आठ वाजता रिसोड (जि. वाशीम) येथील वरिष्ठ पोलिस शेगाव खोडके येथे दाखल झाले आहेत. पुरेशी सुरक्षा मिळाल्याशिवाय खोलीच्या बाहेर येणार नाही अशी भूमिका आंध्र प्रदेश पोलिसांनी घेतली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.
 

बातम्या आणखी आहेत...