Home | National | Other State | angry youth sets own bike on fire after traffic police stops for enquiry

ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यावर इतका संतापला की स्वतःची गाडीच पेटवली; म्हणाला, आता करून घ्या चेकिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:44 PM IST

आरोपी युवक दुग्ध विक्रीचा व्यवसाय करतो.

  • angry youth sets own bike on fire after traffic police stops for enquiry

    गुरुग्राम - ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्याचा एका युवकाला इतका राग आला की त्याने आपल्याच गाडीला आग लावली. गुरुग्रामच्या रेलवे रोड परिसरात मंगळवारी दुपारी एक बाइकस्वार युवकाला पोलिसांनी चेकिंगसाठी अडवले होते. त्यावर तो इतका भडकला होता. मूक दर्शक होऊन पोलिसांना हे दृश्य पाहावे लागले. यानंतर युवक घटनास्थळावरून निघून गेला. ट्रॅफिक पोलिस निरीक्षक रमेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या युवकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


    आरोपी युवक दुग्ध विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला पोलिसांनी सामान्य चौकशीसाठी अडवले होते तेव्हा त्याच्याकडे बाइकची कागदपत्रे नव्हती. यावरून पोलिसांनी त्याला जाब विचारला आणि दोघांमध्ये वाद झाला. काही वेळातच त्याने खिशातून लाइटर काढला आणि बाइकचे पेट्रोल पाइप ओढून त्याला आग लावली. बाइकसमोर नंबर प्लेटवर कपडा लावून झाकण्यात आले होते. तर मागे ओम शनि देवाय नम: HR26 -जाट असे लिहिले होते. ही गाडी चोरीची होती का याचाही तपास केला जात आहे.

Trending