आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाचा टिझर रिलीज, या दिवशी होणार प्रदर्शित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुन्हा उघडणार पडदे , होणार टाळ्यांचा कडकडाट,
रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार…

‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’
८ नोव्हेंबरhttps://t.co/klSOn6MzRO@unbollywood @NikhilSane_ @subodhbhave @sumrag @sonalikulkarni @viacom18marathi @colorsmarathi

— Viacom18 Marathi (@Viacom18Marathi) September 28, 2018
एन्टटेन्मेंट डेस्क: नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्याच्या जीवनावर आधारीत ''आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'' हा सनिमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत या सिनेमाचं टिझर नुकतंच सोशल मिडीयवर लॉंच करण्यात आलं आहे. पुन्हा उघडणार पडदे , होणार टाळ्यांचा कडकडाट, रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार…, असं सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण करणारं कॅप्शनसुद्दा देण्यात आलं आहे. या सिनेमाचा रंगभूमीचा तो सुवर्णकाळ उभा करण्यात आला असून हा शानदार ट्रेलर पाहता ‘आणि काशिनाथ घाणेकर’ सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार यासारख्या अनेक दर्जेदार नाटकांमधील भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे  योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या अद्वितीय प्रवासाची गोष्ट आपल्याला सिनेमारुपात अनुभवता येणार आहे. सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता असं स्थान निर्माण करणारा सुबोध भावे डॉ. घाणेकरांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. तसंच सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन या कलाकारांच्यासुध्दा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

 

अभिजीत शिरीष देशपांडे यांनी "आणि काशिनाथ घाणेकर" या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ज्याच्या नावावर नाटकाला हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते… ज्यांच्या नाटकाने मराठी रसिक प्रेक्षक भारावून जात होते त्या नटवर्य डॉ. घाणेकरांचा जीवनपट उलगडणारा "आणि काशिनाथ घाणेकर" हा सिनेमा 2018 म्हणजेच यंदाच्या दिवाळीत 8 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...