आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिकेत विश्वासरावचे Engagement फोटोज पाहिलेत का तुम्ही! एकेकाळी पल्लवी सुभाषसोबत होता रिलेशनशिपमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव याचा 5 ऑगस्ट रोजी पुण्यात साखरपुडा झाला आहे. अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी त्याचा साखरपुडा झाला. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या साखरपुड्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. अनिकेत आणि स्नेहाचं लग्न जून महिन्यातच ठरलं होतं. साखरपुड्याच्या या फोटोंमध्ये अनिकेत आणि स्नेहाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात आहे.  

 

असे ठरले स्नेहा आणि अनिकेतचे लग्न... 
एका मुलाखतीत स्नेहाने त्यांचे लग्न कसे ठरले याविषयी सांगितले, ती म्हणाली की, आमचे अरेंज मॅरेज आहे. आमचे अफेयर वगैरे काहीच नव्हते. तसेच आम्ही एकमेकांना डेटदेखील केले नव्हते. आमच्या लग्नाबाबतचे जून महिन्यात ठरले. आम्ही एक चित्रपट नुकताच एकत्र केला. त्यापूर्वी आम्ही एकमेकांना फक्त ओळखत होतो. तेव्हा आम्ही सहकलाकार व फ्रेंड्स इतकेच नाते आमच्यात होते. माझ्या घरातले माझ्यासाठी जानेवारीपासून मुलगा शोधत होते. अनिकेतची मावशी आमच्या सोसायटीत राहते. तर मावशी व आई मैत्रीणी असल्यामुळे त्यांचे यासंदर्भात बोलणे झाले. मावशीने माझा अनिकेत नामक पुतण्या आहे. त्याच्यासाठीदेखील मुलगी बघत आहेत. त्याच्याशी बोलून पाहू का? आणि अशाप्रकारे आमच्या लग्नाबाबतचे असे अचानकच ठरले. माझी व त्याची आई एकमेकांशी बोलले. मग, आम्ही दोघे फोनवर बोललो. आम्ही विचार केला की अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा आपण एकमेकांना ओळखतो व एकाच क्षेत्रातील आहोत तर लाइफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार नक्कीच करू शकतो.

 

लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार हे कपल... 
स्नेहा मुळची पुण्याची असल्यामुळे हिंजवडीमध्ये साखरपुडा झाला. लग्नासाठी आता अवकाश आहे. कारण आम्हाला दोघांना खूप काम करायचे आहे, असे स्नेहा म्हणाली. हे दोघे लवकरच आगामी 'हृदयात वाजे समथिंग समथिंग' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. स्नेहाने यापूर्वी स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' या चित्रपटात भूमिका केली होती.


पल्लवी सुभाषसोबत रिलेशनशिपमध्ये होता अनिकेत...
अनिकेत अभिनेत्री पल्लवी सुभाषसोबत एकेकाळी सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. पण काही वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, अनिकेत आणि स्नेहा यांच्या साखरपुड्याचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...