Home | News | Anil Ambani Reached In Udaipur With Mother And Wife For Isha Ambanis pre wedding ceremony

ईशा अंबानीची प्री-वेडिंग सेरेमनी: आई आणि पत्नीसोबत उदयपूरमध्ये पोहोचले अनिल अंबानी, मुबंईहून सोबत आणखी ही एक खास वस्तू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 02:46 PM IST

अमिताभ बच्चन- रतन टाटापर्यंत देश-विदेशातून येणार आहेत 1800 पाहुणे

 • Anil Ambani Reached In Udaipur With Mother And Wife For Isha Ambanis pre wedding ceremony

  उदयपूरः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी त्यांची कन्या ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेरेमनीसाठी गुरुवारी उदयपूरमध्ये पोहोचले. त्यांच्यासह ईशाचा भावी पती आनंद पीरामल, त्याचे वडील अजय पीरामल आणि आई स्वामी पीरामल हे देखील उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. येत्या 8 आणि 9 डिसेंबर रोजी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांची प्री वेडिंग सेरेमनी उदयपूरमध्ये होणार आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी त्यांची पत्नी टीना अंबानी आणि आई कोकिलाबेनसह गुरुवारी येथे पोहोचले. डबोक एअरपोर्टवर रूटीनच्या 20 फ्लाइट्सशिवाय 15 चार्टरही येथे दाखल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 8 किंवा 9 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन पत्नी हिलेरी क्लिंटनसोबत गुरुवारी येथे पोहोचणार आहेत. क्लिंटन दाम्पत्य 4 दिवस मेवाडमध्ये वास्तव्याला असेल. ते 11 डिसेंबर रोजी मुंबईसाठी रवाना होतील.

  अमिताभ बच्चनपासून ते रतन टाटापर्यंत 1800 पाहुणे होतील प्री-वेडिंग सेरेमनीत सहभागी...
  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी बुधवार रात्रीच उदयपूरमध्ये पोहोतले. त्यांनी गुरुवारी दुपारी नाथद्वारा श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतले. 8 आणि 9 डिसेंबर रोजी होणा-या ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेरेमनीत देश-विदेशातील उद्योग हॉलिवूड-बाॅलिवूड, राजकारण आणि क्रिकेट जगतातील मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. काही पाहुणे गुरुवारी पोहोचणार आहेत. उद्योगपती रतन टाटा, मंगलम बिर्ला, गौतम अडाणी आणि अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासोबत 9 डिसेंबरच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेसह अनेक प्रमुख लोक शनिवारी उदयपूरमध्ये पोहोचतील. 8 डिसेंबर रोजी होणा-या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कलाकार सादरीकरण करणार आहेत.


  स्पिन बाइक घेऊन आले अनिल अंबानी...
  अनिल अंबानी उदयपूरमध्ये येताना त्यांची स्पिन बाइक सोबत घेऊन आले आहेत. या बाइकचा वापर ते स्टॅमिना वाढवण्यासाठी करतात.

 • Anil Ambani Reached In Udaipur With Mother And Wife For Isha Ambanis pre wedding ceremony
  आनंद पीरामल शुक्रवारी उदयपूरमध्ये पोहोचला.
 • Anil Ambani Reached In Udaipur With Mother And Wife For Isha Ambanis pre wedding ceremony
  अजय पीरामल आणि स्वाती पीरामल
 • Anil Ambani Reached In Udaipur With Mother And Wife For Isha Ambanis pre wedding ceremony
  ही अनिल अंबानींची स्पिन बाइक आहे. मुंबईहून ही उदयपूरमध्ये आणण्यात आली आहे.
 • Anil Ambani Reached In Udaipur With Mother And Wife For Isha Ambanis pre wedding ceremony
  एअरपोर्टवर राधिका मर्चंट

Trending