आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संचालकपदाचा दिला राजीनामा, कंपनी दिवाळखोरीच्या दिशेने  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अनिल अंबानी यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने शनिवारी रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही माहिती दिली. अनिल अंबानीसह छाया विरानी, रायना करानी, मंजिरी कक्कर आणि सुरेश रंगचर यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. 

सीएफओंनी ऑक्टोबरमध्ये दिला राजीनामा


आरकॉमने बीएसईला सांगितले की, श्री मणिकांतन यांनी ऑक्टोबरमध्ये संचालक आणि सीएफओ पदाचा राजीनामा दिला होता. या सर्वांचे राजीनामे कंपनीच्या पतधारकांच्या समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. 

 

जुलै-सप्टेंबर तिमाहीत 30,142 कोटींचा तोटा झाला


आरकॉम दिवाळखोरीच्या दिशेने आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत 30,142 कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचे कंपनीने शुक्रवारी सांगितले. भारतीय कंपनीचा हा तिमाहीतील दुसरा मोठा तोटा आहे. एजीआर प्रकरणात थकबाकी भरण्यासाठी 28,314 कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे इतके नुकसान झाले.

 

बातम्या आणखी आहेत...