म्युच्युअल फंड / अनिल अंबानींची रिलायन्स म्युच्युअल फंड आता निप्पाॅन इंडिया 

निप्पाॅन लाइफ इन्शुरन्सचा कंपनीतील हिस्सा वाढून 75 %

वृत्तसंस्था

Oct 09,2019 11:45:00 AM IST

नवी दिल्ली - अनिल अंबानी समूहातील रिलायन्स म्युच्युअल फंड या असेट मॅनेजमेंट कंपनीचे नाव आता बदलले आहे. याचे नवीन नाव आता निप्पाॅन इंडिया म्युच्युअल फंड झाले आहे. अनिल अंबानी यांनी हिस्सा विकल्यामुळे हा बदल झाला आहे. या बदलाबराेबरच निप्पाॅन इंडिया म्युच्युअल फंड देशातील माेठी विदेशी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी ठरली आहे.


आयुर्विमा कंपनी निप्पाॅन लाइफ इन्शुरन्सचा कंपनीतील भांडवली हिस्सा वाढून ७५ % झाला आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात निप्पाॅन लाइफ इन्शुरन्सचे अध्यक्ष हिराेशी सिमाजू म्हणाले, संदीप सिक्का विद्यमान व्यवस्थापनासह कंपनीची जबाबदारी सांभाळतील. सिमाजू म्हणाले, कंपनीने २०११ मध्ये भारतीय लाइफ इन्शुरन्सबराेबर व्यवसायात गुंतवणूक केली हाेती. भारतीय अॅसेट मॅनेजमेंटमध्ये २०१२ मध्ये गुंतवणूक सुरू केली हाेती. सिमाजू पुढे म्हणाले, आम्ही निप्पाॅन इंडियाच्या व्यवसायाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्यासाठी आमच्या ग्लाेबल नेटवर्कची मदत देऊ. आमचा भारतीय व्यवसाय स्थानक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी करण्यासाठी वचनबद्ध आहाेत. जपानमध्ये दर १२ व्यक्तींच्यामागे एक व्यक्तीकडे निप्पाॅन लाइफची विमा पाॅलिसी आहे. असेच वातावरण भारतातल्या म्युच्युअल फंड व्यवसायात निर्माण करायचे आहे, असेही ते म्हणाले.

X
COMMENT