अनिल कपूर यांना / अनिल कपूर यांना काही वर्षांपूर्वी केलेल्या चुकीमुळे सगळ्यांसमोर मागावी लागली सोनमची माफी, म्हणले, 'मला खूप वाईट वाटते की, मी मुलांची ती इच्छा पूर्ण नाही करू शकलो'

मुले तुम्हाला की, तुम्ही मुलांना प्रमोट करत आहात ? या प्रश्नावर अनिल कपूर यांनी दिले मजेदार उत्तर... 

दिव्य मराठी वेब टीम 

Jan 24,2019 12:15:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : 'द कपिल शर्मा शो' च्या पुढच्या एपिसोडमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत त्यांची मुलगी सोनम कपूर, जूही चावला आणि राजकुमार राव दिसणार आहेत. हे सर्व आपली अपकमिंग फिल्म 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' च्या प्रमोशनसाठी तिथे शोमध्ये जाणार आहेत. शोदरम्यान, सोनम कपूरने आपले वडील अनिल कपूर यांच्याबद्दल काही खुलासे केले. सोनम म्हणाली, तिचे वडील कधीच पेरेंट्स टीचर मीटिंगमध्ये सामील झाले नाहीत कारण ते नेहमी आपल्या कामात व्यस्त असायचे. सोनम पुढे म्हणाली, पप्पा माझ्या आणि हर्षवर्धनच्या बर्थडे पार्टीजमध्ये खूप उशिरा यायचे. अनेकदा तर ते फिल्मचे कॉस्ट्यूम घालूनच पार्टीत यायचे.

अनिल कपूर यांना नॅशनल टीव्हीवर मुलीची मागावी लागली माफी...
नॅशनल टीव्हीवर आपल्या मुलीच्या तक्रारी ऐकल्यानंतर अनिल कपूर कपूर यांनी तिची माफी मागितली. अनिल कपूर म्हणाले, 'मी सर्वांसमोर सोनमची माफी मागतो, कारण मी त्या काही खास क्षणांचा साक्षीदार बानू शकलो नाही'. 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' मध्ये अनिल आणि सोनम कपूर पहिल्यांदा स्क्रीनवर वडील मुलीचा रोल प्ले करणार आहेत. शैली चोप्रा धरच्या डायरेक्शनमध्ये बनलेली ही फिल्म 1 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. फिल्ममध्ये अनिल कपूर आपली मुलगी सोनमसाठी चांगले स्थळ शोधात असतात. पण तरीही सोनमचे लग्न होत नाही. आता तिचे लग्न का होत नाही, त्याकडे काय कारण आहे हे सस्पेंस तर फिल्म कळेल.

कपिलच्या प्रश्नावर अनिल कपूर यांचे मजेदार उत्तर...
शोमध्ये कपिल शर्माने अनिल कपूर यांनविचारले, 'तुम्ही आलेल्या आणि येणाऱ्या काही चित्रपटांत पुतण्या अर्जुन कपूर (मुबारकां) किंवा मुलगी सोनम कपूर (एक लड़की को देखा तो ऐसा लगा) किंवा मुलगा हर्षवर्धन कपूर (अभिनव बिंद्राची बायोपिक) यांच्यासोबत काम करत आहेत. तर तुम्ही यासर्वांना प्रमोट करत आहात की, हे सर्व मिळून तुम्हाला प्रमोट करत आहेत ?'. अनिल कपूर यांनी यावर मजेदार उत्तर दिले. ते म्हणाले, "पेट्रोलचे भाव इतके जास्त वाढले आहेत की, जेव्हाही ते शूटिंगसाठी निघतात तेव्हा त्यांना वाटते की, आपल्यासोबत आणखी 2-3 कलाकारांना घेऊन जावे".

X
COMMENT