कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये / कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये त्याच्याही अगोदर पोहोचले अनिल कपूर, मीडियाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर स्वतःही म्हणाले, 'हॅप्पी बर्थडे'

62 वर्षांचे अनिल कपूर मीडियाला नव्या जोशाने, उत्स्फूर्तपणे भेटले... 

Dec 26,2018 12:10:00 AM IST

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथचे वेडिंग रिसेप्शन सोमवारी रात्री मुंबईत झाले. यावेळी अनिल कपूर, कपिल आणि गिन्नी स्टेजवर पोहोचण्याआधीच तेथे उपस्थित होते. ते तेथे असलेल्या मीडियाच्या लोकांशी अत्यंत हसत मुखाने, उत्स्फूर्तपणे आनंदाने भेटले. अनिल कपूरला पाहून जेव्हा मीडियाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा एक्साइटेड झालेल्या अनिल कपूर हे स्वतःही 'हॅप्पी बर्थडे' म्हणत होते. त्यांनी सर्वांशी हात मिळवला. आणि मग स्टेजवर फोटोजसाठी पोजही दिल्या. सोमवारी कपिलचे रिसेप्शन तर होतेच पण सोमवारी अनिल कपूर यांचा 62 वा बर्थडेही होता.

X