आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anil Kapoor Daily Workout And Diet Plan: Anil Workout In The Holiday, Proof Age Just A Number

या वयातही फिट आहेत अनिल कपूर, यूरोपमधून आला नवीन फोटो, हॉलिडेमध्येही सोडली नाही एक्सरसाइज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बॉलिवूड स्टार्सला नेहमीच हॉलिडे आणि वेडिंग फंक्शन अटेंड करताना आपले फिटनेस रुटीन साइडमध्ये ठेवावे लागते. पण अनिल कपूर (61) इंडस्ट्रीमधील असे स्टार आहेत, जे या प्रसंगीही फिटनेसवर दुर्लक्ष करत नाहीत. याचे एक उदाहरण स्वतः अनिल कपूर यांनी दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ते ऑस्ट्रेलियामध्ये सुट्या एन्जॉय करतानाही वर्कआउट करताना दिसत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी "ब्यूटीफुल ऑस्ट्रेलियाच्या कुशीत फिटनेस ट्रेनरसोबत फंक्शनल ट्रेनिंग. तुम्ही निसर्गाच्या जवळ असता तेव्हा फिटनेसचा पुर्णपणे नवीन अर्थ निघतो" असे लिहिले आहे. यापुर्वी अनिल कपूर यांनी लंडनमध्ये दिवाळी साजरी केली होती. जवळपास 2 आठवड्यांपासून संपुर्ण कपूर कुटूंब अबरॉड हॉलिडेवर आहे. 


दिवसातून 5-6 वेळा जेवण करतात अनिल कपूर 

- अनिल कपूर यांना वयाच्या 61 व्या वर्षीही कॉमन आजार नाहीत, यामुळे ते स्वतःला नशीबवान समजतात. अनिल यांच्या डायटविषयी बोलायचे झाले तर ते दिवसातून 5-6 वेळा थोडे-थोडे खाता. यामध्ये भाज्या, डाळ, ओट्स, मासे, ब्रोकली, चिकन आणि प्रोटीन शेक्सचा समावेश आहे. 


- अनिल प्रत्येक दिवशी 2-3 तास वर्कआउट करतात. रोज 10 ते 20 मिनिटे कार्डियो केल्यानंतर फ्री वेट, पुश-अप्स, क्रंचेस, चेअर स्क्वाटसारखे टिपिकल वर्कआउट करत राहतात.
- अनिल सकाळी उठून सायकिलिंग करतात किंवा जॉगिंग करतात. योगा हा त्यांच्या रुटीनचा भाग आहे. 

 

फिट राहण्यासाठी या 2 गोष्टींपासून राहतात दूर 
- अनिल कपूर यांचे डेली रुटीन त्यांच्या फिटनेसचे रहस्य आहे. एका मुलाखती दरम्यान सोनम कपूरने सांगितले होते की, अनिल कपूर रात्री 11 वाजता झोपतात. यामुळे रात्री उशीराच्या पार्टीजमध्ये दिसत नाही.
- झोपण्या आणि उठण्याच्या वेळा पाळण्यासोबतच अनिल कपूर स्ट्रिक्ट डायट फॉलो करतात. ते शुगर आणि जंक फूड अव्हॉइड करतात. अनिल मानतात की, जास्तीत जास्त हेल्थ इश्यूज शुगरमुळेच होतात. तुम्ही हे जेवढे कमी खाल्ले, तुमचे आरोग्य तेवढे चांगले राहू शकते. 

अनिल कपूर यांनी स्वतः मीडियावर रिव्हिल केले आहेत, त्यांचे फिटनेस सीक्रेट्स...


1. सकाळी 6 वाजता उठतात 
- ते रोज सकाळी 6 वाजता उठतात आणि सायकिलिंग आणि जॉगिंग करतात. सकाळी केळी खातात. यामुळे कार्बोहायड्रेट, पोटॅशियम आणि आयरन मिळते. प्रत्येक दिड-दोन तासात काही तरी खातात. प्रत्येक वेळी ते कॅलरी काउंट करतात.
- स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि अॅप्पल ज्यूस पिणे त्यांना आवडते. ते उकळलेली गोभी आणि सलाद डिफरेंट सॉससोबत घेतात. यासोबतच उकळलेली डाळ ब्राउन राउससोबत खातात. 

 

2. धान्य आणि फळांच्या प्रॉपर कॉम्बिनेशनवर फोकस करतात 
- ब्रेकफास्टमध्ये अंडे आणि धान्य-फळांचे कॉम्बिनेशन असते. सँडविचसोबत पत्ताकोबी, सलाद आणि अंडे खातात. ते जवळपास 140 ग्राम प्रोटीन शेकमधून घेतात. कधी-कधी या ऐवजी यासोबतच अंकुरित धान्य घेतात.
- संध्याकाळी शेक, चिकन आणि टर्की सँडविच घेतात. डिनरमध्ये 250 ग्राम चिकन आणि फिशचा समावेश असतो. यानंतर स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर खुप पाणी पितात. 


3. फिट आणि सडपातळ दिसणे पहिली इच्छा 
- 2-3 तास जिममध्ये घालवतात. जिममध्ये 10 मिनिटे कार्डियो, सिट-अप्स, क्रंचेस, चेअर स्क्वॉट्स आणि पुशअप्स करतात.
- आठवड्यातून 3 दिवस जिममध्ये जातात आणि 3 दिवस आउटडोर अॅक्टिव्हिटीज करतात. प्रत्येक दिवशी बॉडीच्या वेगवेगळ्या भागांच्या हिशोबाने एक्सरसाइज करतात. मला फिट आणि सडपातळ दिसायचे आहे असे ते म्हणतात. 

 

4. झोप पुर्ण घेतात 
- अनिल म्हणतात की, - "मी दिवसा खुप काम करतो आणि रात्री वेळेवर झोपतो. कमी झोपेमुळे लोक नेहमीच तणावात असतात. चांगली झोप घेण्याची सर्वात सोपी पध्दत म्हणजे, दिवसभर खुप काम करत राहा आणि थकून जा."

- त्यांना नैसर्गिक गोष्टींवर जास्त विश्वास आहे. ते म्हणतात की, एक्सरसाइज आणि योग्य डायट ही आपल्या केसांना त्वचेला मेंटेनकरण्याची सर्वात चांगली पध्दत आहे. 

बातम्या आणखी आहेत...