आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anil Kapoor Harshavardhan Kapoor Preparing For The Abhinav Bindra's Biopic, Meets His Family

अनिल कपूर आणि मुलगा हर्षवर्धन करत आहेत अभिनव बिंद्राच्या बायोपिकसाठी तयारी, वर्ल्ड चॅम्पियन शूटरच्या फॅमिलीची घेतली भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अनिल कपूर आपला धाकटा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत ओलिंपिक आणि वर्ल्ड चॅम्पियन शूटर अभिनव बिंद्राच्या बायोपिकवर काम  आहे. अनिल आणि हर्षवर्धन यांनी चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. दोघांनी अभिनव आणि त्याचे पिता अपजीत बिंद्रा यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी असा अंदाज लावला जात होता की, कदाचित हा प्रोजेक्ट बंद होऊ शकतो. पण कलाकारांच्या भेटीनंतर आता हे कन्फर्म झाले आहे की, कनन अय्यर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग याचवर्षाच्या अखेरपर्यंत सुरु होईल आणि पुढच्यावर्षी हा रिलीज केला जाईल.  

 

हर्षवर्धन घेत आहे शूटिंगचे ट्रेनिंग... 
रिपोर्ट्सनुसार, अनिल आणि हर्षवर्धन, बिंद्रासोबत वेळ घालवत आहेत. ते त्याच्या सवयी आणि बाकीच्या सर्व गोष्टी आत्मसात  आहेत. या चित्रपटासाठी दोन्ही अभिनेत्यांची इच्छा आहे की, त्यांनी अभिनवचे आयुष्य  प्रकारे पडद्यावर साकारावे. त्यामुळे त्यांनी तयारीसाठी जास्त वेळ घेतला आहे. हर्षवर्धन शूटिंगचे खास ट्रेंनिग घेत आहे आणि ते पूर्ण केल्यानंतर त्यांना फिजिकल ट्रेनिंगदेखील घ्यावी लागेल.  

 

अशा महान कथा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे - अनिल कपूर.... 
अनिल आणि अपजीत यांनी चंडीगडमध्ये भेट घेतली आणि या कॅव्हित्रपटात भूमिकेच्या प्रेजेंटेशनबद्दल बोलण्याबरोबरच अपजीतयांच्याकडून सॅलेदेखील घेतले. चित्रपटात कथा आणि भूमिका रिअल आणि ऑथेंटिक दिसेल. अनिल कपूर म्हणाले, 'मला वाटते अशा महान कथा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ही चांगली गोष्ट होती की, आम्हाला या भेटीमध्ये बिंद्रा कुटुंबीयांचा प्रवास आणि अभिनवच्या करियरबद्दल काही नवीन गोष्टी कळाल्या. हा चित्रपट आम्ही लवकरात लवकर प्रदर्शित करू इच्छितो.'