Home | Maharashtra | Mumbai | Anil Kapoor reveals he Used To Touch sister in law Sridevi Feet for Mark Of Respect in every time when they met

अवॉर्ड असो किंवा फॅमिली फंक्शन, 7 वर्षे लहान श्रीदेवीला पाहताच दर्शन घेत होते अनिल कपूर, वहिनीच्या निधनाच्या 9 महिन्यानंतर सांगितले याचे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:00 AM IST

जेव्हा श्रीदेवीने अनिल यांच्यासोबत काम करण्यास दिला होता नकार...

 • Anil Kapoor reveals he Used To Touch sister in law Sridevi Feet for Mark Of Respect in every time when they met

  मुंबई. अनिल कपूर (61) ने आपली वहिनी श्रीदेवी(54) संबंधीत एक खुलासा केला. अनिल नुकतेच जितेंद्र यांच्यासोबत 'डान्स प्लस-4' रियलिटी शोच्या स्पेशल एपिसोडमध्ये आले होते. स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेत्री श्रीदेवींना श्रध्दांजली देण्यात आली. याचवर्षी 24 फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले होते. अनिल कपूर यांचे भाऊ बोनी कपूर यांचे 1996 मध्ये श्रीदेवींसोबत लग्न झाले होते. या नात्याने श्रीदेवी अनिल यांच्य वहिनी होत्या. अनिल यांनी सांगितले की, ते श्रीदेवीला भेटायचे तेव्हा त्यांचे पाय पडायचे. फंक्शन, इव्हेंट किंवा अवॉर्ड फंक्शन श्रीदेवी दिल्यावर ते पहिले एवढ काम करायचे. अनिल नेहमी वहिनीला रिस्पेक्ट देण्यासाठी त्यांचे पाय पडत होते आणि श्रीदेवी यामुळे नेहमीच अनकम्फर्टेबल होत होत्या. यामुळे श्रीदेवी नेहमीच या गोष्टी नकार द्यायचा. अनिल कपूर यांनी श्रीदेवी यांची काम करण्याची पध्दत, चित्रपट आणि व्यक्तिमत्त्वाला नेहमीच एप्रीशेएट केले आहे. अनिल आणि जितेंद्र दोघांनीही श्रीदेवींसोबत बरेच चित्रपट केले आहे यामुळे दोघंही या एपिसोडचे पाहूणे बनले होते.

  जेव्हा श्रीदेवीने अनिल यांच्यासोबत काम करण्यास दिला होता नकार...
  - अनिल आणि श्रीदेवीची जोडी बॉलिवूडमधील प्रसिध्द जोडी मानली जाते. दोघांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. पण श्रीदेवीने काही काळानंतर अनिल यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.
  - पहिले मिस्टर इंडियामध्ये अनिल कपूर यांची भूमिका अमिताभ बच्चन करणार होते. पण काही कारणांमुळे ही भूमिका अनिल कपूर यांना मिळाली.
  - 'जुदाई' चित्रपटानंतर श्रीदेवींनी अनिल कपूरसोबत काम करण्यात नाखुशी दर्शवली. असे बोलले जाते की, श्रीदेवींना वाटत होते की, अनेक वेळा एकाच अॅक्टरसोबत स्क्रीन शेअर केल्याने जोडी आणि अॅक्टर दोघांचीही क्रेझ संपून जाते.
  - याच कारणांमुळे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या 'बेटा' या चित्रपटामध्ये त्या नव्हत्या. पण या चित्रपटातील भूमिका श्रीदेवींसाठी लिहिण्यात आली होती.
  - अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी कर्मा (1986), मि. इंडिया (1987), राम अवतार (1988), सोने पे सुहागा (1990), लम्हें (1991), हीरा रांझा (1992), गुरुदेव (1993), रूप की रानी चोरों का राजा (1993), लाड़ला (1994), मिस्टर बेचारा (1996) आणि जुदाई (1997) सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

  अमिताभ होते मिस्टर इंडियाची पहिली पसंत?
  - काही वर्षांपुर्वी अनिल कपूर यांनी एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी चकीत करणारे खुलासे केले होते. अनिल यांच्यानुसार, त्यांच्या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये अमिताभ यांना घेण्यात आले होते. पण काही कारणांमुळे त्यांना हा चित्रपट मिळाला.
  - अनिल म्हणाले होते की, मिस्टर इंडियाची भूमिका अमिताभ यांचा विचार करुन लिहिण्यात आली होती. तसेच 'मेरी जंग' हा चित्रपटही अमिताभ करणार होते. पण दोन्हीही चित्रपट अनिल कपूर यांना मिळाली. या काळात श्रीदेवींनी अमिताभसोबत काम करण्यास नकार दिला होता अशा चर्चाही होत्या.

Trending