आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. 61 वर्षांच्या अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते गोव्याच्या बीचवर धावताना दिसत आहेत. व्हिडिओसोबत त्यांनी माजी लॉन्ग डिस्टेंस रनर पॉल टार्गेट यांचे विचारही शेअर केले आहे. अनिल यांनी लिहिले की, "स्वतःला विचार की, मी अजून करु शकतो का? 'सामान्यतः उत्तर हो येते - पॉल टार्गेट'" सध्या अनिल कपूर लेक रियासोबत गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI 2018) मध्ये पोहोचले होते. याची क्लोजिंग सेरेमनी 28 नोव्हेंबरला आहे.
अक्टोबरमध्ये म्हणाले होते - मला चालायलाही त्रास होत होता
- अनिल यांनी अक्टोबरमध्ये एक व्हिडिओ शेअर करुन सांगितले होते की, त्यांना ऐकेकाळी चालतानाही त्रास होत होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "एक काळ होता तेव्हा मला चालतानाही त्रास होत होता. काही वर्षांपुर्वी मला इजा झाली होती. ती ईजा ठिक होण्यात खुप काळ लागला पण आता मी फिट आहे आणि हे माझ्यासाठी एखाद्या अचिव्हमेंट आणि विक्ट्रीपेक्षा कमी नाही."
हे आहे अनिल कपूरच्या फिटनेसचे रहस्य
- अनिल कपूर नेहमीच आपल्या वर्कआउटचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. एका व्हिडिओमध्ये त्यांनी लिहिले होते की, "हार्ड वर्कआउटचे सब्सिटीट्यूट काहीच नाही." अनिल कपूर वयाच्या 61 व्या वर्षी स्वतःला एकदम फिट ठेवतात आणि यामागे त्यांच्ये डेली रुटीन आहे. एका मुलाखतीदरम्यान सोनम म्हणाली होती की, पापा अनिल कपूर रात्री 11 वाजता झोपून जातात आणि यामुळेच ते रात्री उशीरापर्यंत सुरु असणा-या बॉलिवूड पार्टीमध्येही दिसत नाहीत. झोपण्या आणि उठण्यासोबतच अनिल कपूर स्ट्रिक्ट डायटही फॉलो करतात. ते शुगर आणि जंक फूड अव्हॉइड करतात. अनिल कपूर मानतात की, जास्तीत जास्त हेल्थ इश्यूज शुगरमुळे होतात आणि तुम्ही हे जेवढे कमी खाल्ले तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहिल.
दिवसातून 5 ते 6 वेळा जेवण करतात अनिल
अनिल कपूर स्वतःला नशीबवान मानतात कारण त्यांना कोणताही आजार नाही. अनिल कपूर यांच्या डायटविषयी बोलायचे झाले तर दिवसातून 5-6 वेळा थोडे-थोडे जेवण करतात. यामध्ये भाज्या, डाळ, ओट्स, मासे, ब्रोकली, चिकन आणि प्रोटीन शेक्सचा समावेश असतो.
2 ते 3 तास वर्कआउट करतात
अनिल कपूर रोज 2 ते 3 तास वर्कआउट करतात. तो आपले नियम आणि बॉडी पार्ट्सच्या गरजेनुसार वर्कआउट बदलत राहतात. प्रत्येक दिवशी 10 ते 20 मिनिटे कार्डियो केल्यानंतर ते फ्री वेट, पुश-अप्स, क्रंचेस, चेअर स्क्वाटसारके टिपिकल वर्कआउट करतात. त्यांच्या वर्कआउटमध्ये फास्ट सायकिलिंगचाही समावेश असतो. ते सकाळी उठून सायकिलिंग करतात किंवा जॉगिंग करतात. त्यांनी आपल्या रुटीनमध्ये योगा प्रॅक्टिसचाही समावेश केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.