आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 63 व्या वर्षी अगदी फिट आहेत अनिल कपूर, लेटनाइट पार्ट्यापासून राहतात दूर, टाळतात साखर खाणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. 24 डिसेंबर 1956 रोजी मुंबईच्या चेंबूर येथे जन्मलेले अनिल या वयात स्वत: ला अगदी फिट ठेवले असून त्यात त्यांच्या डेली रुटीनचा मोठा वाटा आहे, एका मुलाखतीत त्यांची मुलगी सोनमने सांगितले होते की, पापा अनिल कपूर रात्री 11 वाजता झोपी जातात आणि म्हणूनच ते रात्री उशिरा होणा-या बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसत नाहीत.

  • शिस्तबद्ध आहार देखील तंदुरुस्तीचे रहस्य आहे

सोनमच्या म्हणण्यानुसार, अनिल कपूर झोपेसमवेत शिस्तबद्ध आहार घेतात. ते साखर आणि जंक फूड टाळतात. अनिल कपूर यांचा असा विश्वास आहे की, आरोग्यामधील बहुतेक समस्या साखरेमुळे होतात आणि तुम्ही ते जितके कमी खाल तुमचे स्वास्थ्य चांगले होईल.

  • दिवसातून 5 ते 6 वेळा जेवण करतात अनिल

अनिल कपूर वयानुसार होणा-या  सामान्य आजारांपासून दूर असल्याने  स्वत: ला भाग्यवान मानतात. अनिल कपूरच्या डाएटबद्दल बोलायचे म्हणजे ते दिवसातून 5 ते 6 वेळा थोडे-थोडे खातात. यात भाज्या, डाळी, ओट्स, फिश, ब्रोकोली, चिकन आणि प्रथिन शेकचा समावेश आहे.

  • 2 ते 3 तास करतात वर्कआउट

अनिल कपूर दररोज 2 ते 3 तास वर्कआउट करतात. ते त्यांच्या नियमांनुसार आणि शरीराच्या अवयवांच्या आवश्यकतेनुसार व्यायाम बदलतात. दररोज 10 ते 20 मिनिटे कार्डिओ केल्यानंतर ते फ्री वेट, पुश-अप, क्रंच, चेअर स्क्वॅट्स सारखे वर्कआउट करतात. त्यांच्या वर्कआउटमध्ये सायकलिंग देखील समाविष्ट आहे. ते एकतर सकाळी सायकल चालवतात किंवा जॉगिंग करतात. त्यांनी योगालाही आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवले आहे.

बातम्या आणखी आहेत...