धमतरी / व्यक्तीच्या घरात आढळले हरिण, तरस आणि अजगरासारखे जंगली प्राणी, म्हणाला - हे माझे खासगी प्राणिसंग्रहायल आहे

वन विभागाने खासगी प्राणिसंग्रहालयावर टाकली धाड, प्राण्यांची तस्करी करत असल्याचा संशय
 

दिव्य मराठी

Jul 02,2019 03:39:00 PM IST

धमतरी (छत्तीसगड) - धमतरी शहरापासून 30 किमी दूर असलेल्या रतावा गावात वन विभागाने धाड टाकत एका घरातून अनेक जंगली प्राणी ताब्यात घेतले. यामध्ये हरणाचे दोन पाडस, 2 तरस, 2 अजगर आणि 6 पोपटांचा समावेश आहे. हंसराज देव या व्यक्तीने आपल्या घरात मोठ-मोठे पिंजऱ्यात प्राण्यांना बंद करून ठेवले होते. हे माझे खासगी प्राणिसंग्रहालय असल्याचे हंसराजने चौकशी दरम्यान सांगितले.

चौकशीनंतर करण्यात येणार कारवाई

हंसराजने चौकशी दरम्यान वन्य जीव संरक्षण आणि पर्यावरण सुरक्षा समिती रतावाच्या नावाने संचलित प्राणी संग्रहालयाचे कागदपत्रे सादर केले. तसेच आपण प्राण्यांची काळजी घेत असल्याचे सांगितले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे ताब्यात घेऊन हंसराजलाला सोडून दिले. कागदपत्रींची तपासणी सुरू असून तपास अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 2 वर्षांपूर्वी देखील हंसराजच्या ताब्यातून मोठ्या संख्येने प्राणी जप्त केल्याचे बिरगुडी रेंजर सोनेसिंह सोरी यांनी सांगितले.


2 ते 7 वर्षांपर्यंत होऊ शकते शिक्षा
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कोणत्याही प्राण्याला कैद करून ठेवणे किंवा त्याची हत्या करणे याबाबत दोन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. वाइल्ड लाइफ अॅक्ट 1991 अंतर्गत सिंह, चित्ता, अस्वल, हरिण आणि साप यांच्या नावे महत्वपूर्ण प्राण्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अशा प्राण्यांना कोणतीही संस्था किंवा व्यक्ती आपल्या ताब्यात ठेवून शकत नाही. असे केल्याचे आढळून आल्यास अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्याचा नियम आहे.


कोणीही उभारू शकत नाही खासगी प्राणिसंग्रहायल
वन विभागाच्या तज्ज्ञांनुसार, कोणतीही संस्था किंवा व्यक्ती खासगी प्राणिसंग्रहायल उभारू शकत नाही. राज्य सरकारला केंद्रीय प्राणिसंग्रहायल अथॉरिटीकडून प्राणिसंग्रहायल सुरु करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. सेंट्रल झू अथॉरिटीने खूपच कडक नियम तयार केले आहेत. त्या नियमांची पूर्तता केल्यानंतरच राज्य सरकारला प्राणिसंग्रहालय सुरु करण्याची परवानगी देण्यात येते.

X