आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरच्या वैज्ञानिकांनी आपल्या एका संशोधनात सांगितल्याप्रमाणे, मागच्या ४० वर्षांत जमीन, नदी आणि समुद्रात राहणाऱ्या जीवांची संख्या नष्ट होत आहे. कारण मनुष्य त्यांचा उपयोग खाण्यासाठी करताे. या प्राण्यांच्या नैसर्गिक स्रोतांना प्रदूषित किंवा नष्ट करताे. जगातील या नैसर्गिक प्रजाती आणि इको सिस्टिम ही नष्ट होण्याची सध्या चिन्हं दिसत आहेत. हा इशारा आपल्याला किती समजला आहे हे मला माहीत नाही, परंतु नवीन पिढी आणि आदिवासी यांच्या भल्यासाठी काही चांगली उदाहरणं सांगतो ती पुढीलप्रमाणे आहेत.
उदाहरण १- एक आधुनिक पद्धतीचे कार्यालय आहे. त्यात रोज वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरण असते. याचे कारण काही कर्मचाऱ्यांनी आपल्या टेबलाखाली काही कुत्र्यांना पाळलं आहे, आणि कर्मचारी आपल्या लॅपटॉपवर काम करत आहेत. एका टेबलाखाली एक गोल्डन रिट्रीवर प्रजातीचा कुत्रा सुस्तपणे झोपला आहे आणि मध्येमध्ये डोळे उघडून खात्री करायचा की आपला मालक पण अजून इथंच बसला आहे काय. कधी कधी तो रागात असायचा कारण त्याच्यावरती वेगवेगळ्या जातींचे अनेक पक्षी कलकलाट करत राहायचे. जर अशा वेळेत तुम्ही त्या कुत्र्याच्या भावना शब्दांत व्यक्त करायच्या ठरवल्या तर त्या पुढीलप्रमाणे होतील, काय तुम्ही तुमचं तोंड बंद नाही करू शकत काय? नाही तर वरती येऊन मी तुम्हाला मारीन. पण अशा वेळेत कधी कधी हा कुत्रा अशी जागा शोधायचा की आपल्या मालकावर नजर ठेवता येईल आणि शांतपणे झोपूही शकेल. चेन्नईमध्ये या वर्षी ४ नोव्हेंबरला उद्घाटन झालेल्या एका कार्यालयाचे वातावरण एका प्राणिसंग्रहालयाप्रमाणे होतं, प्रत्येक प्रजातीच्या प्राण्यांचं आपलं एक वेगळं स्थान असतं. यामध्ये मनुष्याचाही समावेश आहे. पण इथं सर्वांसाठी प्रवेश खुला नाहीये. तुम्ही चुकीचा विचार करू नका की हे एका विशिष्ट समुदायासाठीच आहे. खरं तर हा एक भव्य २५ सीटर वर्किंग स्पेस आहे, जो डिझाइन करणाऱ्यांसाठी बनवला आहे. याचे नाव कोड-७ आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं पाळीव प्राण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. इथं त्यांना आणण्यासाठी कोणतीही बंदी नाहीये. आता उदयोन्मुख डिझायनर या कार्यालयात फिरू शकतात आणि येथे स्वत:साठी एक मार्गदर्शकसुद्धा शोधू शकतात. कारण सर्व खुर्च्या या व्यावसायिक डिझायनरच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी ऑफिस मॅनेजमेंट आठवड्याच्या शेवटी एका कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
उदाहरण २- मिलेनियन कार्यालयाप्रमाणेच, गुवाहाटीजवळील विश्वनाथ घाटातील आदिवासी महिला विणकरांनी त्यांच्या भागातील गोड्या पाण्याच्या कासवांच्या संवर्धनासाठी कासवांच्या छायाचित्रांसह एक खास स्कार्फ तयार केला आहे. येथे १६ नोव्हेंबर रोजी आठ महिला विणकरांनी ‘कासो सखी’ नावाचा एक बचत गट स्थापन केला आहे.खरं तर याचा उद्देश हा धोक्यात असलेल्या नैसर्गिक जीवांचे संवर्धन आणि सुरक्षा प्रदान करणे हा आहे. या महिलांनी बनवलेल्या स्कार्फला स्थानिक आणि वैश्विक मंचावर प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेचा हेतू हा महिला विणकरांच्या हस्तशिल्पकलेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना आत्मनिर्भर करणे असा आहे. आणि यातूनच त्यांचे आणि त्या भागातील कासवांचे भविष्य उज्ज्वल होईल.
फंडा असा : भविष्यात आपल्या कामाचे क्षेत्र हे प्राण्यांच्या उन्नतीचे व्यासपीठ ठरेल. झाडं ही त्या जागेचं सौंदर्य वाढवतात, पण भविष्यात आता प्राणीही त्यांना साथ देतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.