आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राफेल पुजनाच्या वेळी चाकाखाली ठेवले लिंबू, अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून निषेध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फ्रान्सकडून भाराताला पहिले राफेल विमान मिळाले आहे. काल दसऱ्यानिमित्त राजनाथ सिंह राफेल घेण्यासाठी गेले होते. दसऱ्यानिमित्त शस्त्रांची पुजा केली जाते, त्यामुळेच राजनाथ यांनी राफेलची पुजा केली. पण, यावेळी त्यांनी राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवले. हे प्रकरण आता चांगलेच चर्चेत आले आहे. "अंधश्रद्धा निर्मूलन समिती"कडून या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. वैज्ञानिक युगात अशा प्रकारचं कृत्य केल्याबद्दल "अंनिस"ने नाराजी व्यक्त केली.
देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. पण आजही अंधश्रद्धेचे पालन केले जाते. आताच कळाले की, राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून पूजा केल्याचे फोटो व्हायरल झाले आहे. याची शहानिशा करायला हवी. खरंच हा प्रकार घडला असल्यास अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारचे अवैज्ञानिक कृत्य आधीही कधी झाले नाही. आज विज्ञान युगातही आपण अवैज्ञानिक कृत्य करत असल्याचे जगाला दाखवत आहोत. असे मत अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...