आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंनिसचे ५ वर्षांपासूनचे अांदाेलन अाता थांबणार; तपासाला गती मिळाल्याने निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येस पाच वर्षे पूर्ण झाली. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी अंनिसच्या वतीने दर महिन्याच्या २० तारखेला जिथे दाभाेलकरांची हत्या झाली त्या पुण्यातील महर्षी वि. रा. शिंदे पुलावर अांदाेलन केले जात हाेते. मात्र अाता प्रमुख मारेकरी पकडले असून तपासही समाधानकारक दिशेने सुरू असल्यामुळे हे अांदाेलन यापुढे स्थगित करण्याचा निर्णय अंनिसने घेतला अाहे. 


एखाद्या मागणीसाठी सलग पाच वर्षे सनदशीर मार्गाने अांदाेलन करत राहणे ही बाब महत्त्वपूर्ण आहे. अंनिसने यामाध्यमातून एक नवा आदर्श घालून दिला अाहे. अापली एखादी मागणी मान्य न झाल्यास हिंसक मार्गाने दगडफेक, जाळपाेळ करून प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचे तंत्र समाजात माेठ्या प्रमाणात वापरले जात असताना अहिंसक पद्धतीने तपास यंत्रणावर दबाव निर्माण करता येऊ शकतो, हे यातून दिसून अाले अाहे. 


१०० शाखांत वाढ 
डाॅ. दाभाेलकर यांनी १८ वर्षे लढा दिलेला जादूटाेणाविराेधी कायदा समंत हाेऊन अातापर्यंत राज्यभरात ७५० गुन्हे सदर कायद्यानुसार दाखल झाले आहेत. जात पंचायतविराेधी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. सध्या अंनिसच्या शाखांत १०० ने वाढ झाली असून आता राज्यात ३०० शाखा अाहेत. 


अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख 'दिव्य मराठी'शी बाेलताना म्हणाले, डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांनी समाजातील अपप्रवृत्ती दूर होण्यासाठी अायुष्यभर प्रयत्न केले. मात्र, त्यांचा खून करण्यात आला. त्यांचा जरी खून करण्यात आला तरी त्यांचे विचार आजही टिकून आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...