आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळ्या मुलांची आई होणार आहे टीव्हीची नागिन? पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मुलांबद्दल लिहिली एवढी मोठी गोष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही सीरियल 'नागिन 3' मध्ये विष कन्या उर्फ विशाखाचा रोल करणारी अनीता हसनंदानी प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. सांगितले जात आहे की, लवकरच ती जुळ्या मुलांची आई होणार आहे. ही चर्चा अनीताच्या एका सोशल मीडिया पोस्टमुले सुरु झाली. झाले असे की, तीने पती रोहित रेड्डीसोबतच आपला एक व्हिडीओ शेयर करत लिहिले, "माझ्या आयुष्यातील प्रेमासाठी, जो दिवसेंदिवस अजूनच सेक्सी होत आहे. तुला आनंदाने भरपूर आणि सिक्स पॅक्स एब्सवाले आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हो... लवकरच दोन गोड मुलेसुद्धा...लवकरच. आय लव्ह यू टू दि मून अँड बॅक." अनीताने ही पोस्ट रोहित रेड्डीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केली होती. पण त्यानंतरच असा अंदाज लावला जात आहे की, अनीता जुळ्या मुलांची आई होणार आहे. 

अनीताने 2013 मध्ये रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते. रोहित कॉर्पोरेट प्रोफेशनल आहे. अद्याप दोघांना एकही अपत्य नाही. फेब्रुवारीमध्ये अशी चर्चा झाली होती की, अनीता सेरोगसीद्वारे आई होऊ शकते. तेव्हा तिने एका इंग्रजी वेबसाइटसोबतच्या बातचीतीमध्ये सांगितले होते की, "सेरोगसीने आई होण्याच्या प्लानिंगच्या बातम्यांमध्ये काहीही सत्यता नाही. आम्ही बाळाबद्दल विचार केला आहे. मला नॅच्युरल आणि नॉर्मल पद्धतीनेच बाळ हवे आहे. आशा आहे, जर सर्वकाही प्लानप्रमाणे झाले तर पुढच्या वर्षीपर्यंत आमचे बाळ होऊ शकते." अनीता पुढे म्हणाली, "आता सध्या मी दोन टीव्ही शोजमध्ये व्यस्त आहे आणि माझी इच्छा आहे की, बाळ झाल्याच्या दरम्यान मी फ्री असावी. प्रेग्नन्सीदरम्यान मला कोणत्याही प्रकारचे हेक्टिक शेड्यूल नकोय. त्यामुळे जसे माझे  ऑनगोइंग फँटसी ड्रामा संपतील, तेव्हा मी फॅमिली वाढवण्याबद्दल विचार करेन."

मी 100 टक्के मदरहुड एन्जॉय करू इच्छिते : अनीता... 
- अनीता म्हणाली, "हेच बेबी होईल तेव्हा मदरहुड निश्चितच माझे आयुष्य असे बदलेल जसे जगभरातील सर्व मतांचे बदलते. मी बाळासाठी खूप एक्साइटेड आहे. यामुळे जेव्हा माझ्यासोबत असे होईल तेव्हा मी 100 टक्के त्याला देईन. मदरहुड माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची फेज असेल."

बातम्या आणखी आहेत...