आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : टीव्ही सीरियल 'नागिन 3' मध्ये विष कन्या उर्फ विशाखाचा रोल करत असलेली अनीता हसनंदानी मागील काही दिवसांपासून प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. सांगितले जात आहे की, लवकरच ती जुळ्या मुलांची आई होणार आहे. या सर्व बातम्यांमधेच अनीताने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करतांना दिसत आहे. या फोटोवर तिने गंमतीशीर कॅप्शन लिहिले आहे, जे वाचून सोशल मीडिया यूजर्स तिला प्रश्न विचारत आहेत. अनीताने फोटोवर कॅप्शन लिहिले, 'जर खोट्या बेबी बंपसोबत अशी अवस्था आहे तर जेव्हा खरोखरी होईल तेव्हा काय होईल ?' अनीताला पाहून यूजर्ससोबतच तिचा पती रोहित रेड्डीदेखील प्रश्न करत आहे. त्याने फोटो पाहून विचारले - 'बेली बटन कुठे गायब झाले ?' तर ती काही उत्तर नाही देऊ शकली.
- अनीताचे बेबी बंप पाहून एका यूजरने विचारले - 'काही वेळेसाठी तर मी हैराण झालो होतो, हे केव्हा झाले.' एकाने लिहिले, 'तुमच्या बेबीकडे स्पेशल पॉवर असेल की, नाही हे जाणून घेण्यासाठी एक्साइटेड आहे'. एका यूजरने विचारले, 'ही तर नागिन आहे ही खरंच प्रेग्नन्ट आहे की खोटे आहे.' एकाने विचारले - 'दीदी खरोखरी आम्ही केव्हा मामा होऊ'. टीव्ही अभिनेता करणवीर बोहराने देखील कमेंट केली. त्याने लिहिले, 'हे नागिनचे बाळ आहे याला गर्भनाळेची गरज नाही.'`
View this post on InstagramA post shared by Anita H Reddy (@anitahassanandani) on Mar 29, 2019 at 12:21am PDT
अशाप्रकारे झाली होती प्रेग्नन्सीची चर्चा...
- ही चर्चा अनीताच्या एका सोशल मीडिया पोस्टमुले सुरु झाली. झाले असे की, तीने पती रोहित रेड्डीसोबतच आपला एक व्हिडीओ शेयर करत लिहिले, "माझ्या आयुष्यातील प्रेमासाठी, जो दिवसेंदिवस अजूनच सेक्सी होत आहे. तुला आनंदाने भरपूर आणि सिक्स पॅक्स एब्सवाले आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हो... लवकरच दोन गोड मुलेसुद्धा...लवकरच. आय लव्ह यू टू दि मून अँड बॅक." अनीताने ही पोस्ट रोहित रेड्डीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केली होती. पण त्यानंतरच असा अंदाज लावला जात आहे की, अनीता जुळ्या मुलांची आई होणार आहे.
- अनीताने 2013 मध्ये रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते. रोहित कॉर्पोरेट प्रोफेशनल आहे. अद्याप दोघांना एकही अपत्य नाही. फेब्रुवारीमध्ये अशी चर्चा झाली होती की, अनीता सेरोगसीद्वारे आई होऊ शकते. तेव्हा तिने एका इंग्रजी वेबसाइटसोबतच्या बातचीतीमध्ये सांगितले होते की, "सेरोगसीने आई होण्याच्या प्लानिंगच्या बातम्यांमध्ये काहीही सत्यता नाही. आम्ही बाळाबद्दल विचार केला आहे. मला नॅच्युरल आणि नॉर्मल पद्धतीनेच बाळ हवे आहे. आशा आहे, जर सर्वकाही प्लानप्रमाणे झाले तर पुढच्या वर्षीपर्यंत आमचे बाळ होऊ शकते."
- अनीता पुढे म्हणाली, "आता सध्या मी दोन टीव्ही शोजमध्ये व्यस्त आहे आणि माझी इच्छा आहे की, बाळ झाल्याच्या दरम्यान मी फ्री असावी. प्रेग्नन्सीदरम्यान मला कोणत्याही प्रकारचे हेक्टिक शेड्यूल नकोय. त्यामुळे जसे माझे ऑनगोइंग फँटसी ड्रामा संपतील, तेव्हा मी फॅमिली वाढवण्याबद्दल विचार करेन."
- अनीता म्हणाली, "जेव्हा बेबी होईल तेव्हा मदरहुड निश्चितच माझे आयुष्य असे बदलेल जसे जगभरातील सर्व मतांचे बदलते. मी बाळासाठी खूप एक्साइटेड आहे. यामुळे जेव्हा माझ्यासोबत असे होईल तेव्हा मी 100 टक्के त्याला देईन. मदरहुड माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची फेज असेल."
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.