आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी मिळताच कशी बदलतात मुले, टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानीने व्हिडीओ बनवून सांगितली मजेशीर कहाणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री अनीता हसनंदानीने आपल्या इंस्टाग्रामवर एक खूप मजेशीर व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, मुलीला पटवण्यासाठी मुले काय काय युक्त्या करतात. एवढेच नाही तर यामध्ये हेही दाखवले आहे की, मुलगी पटल्यानंतर बॉयफ्रेंडची काय हालत होते.

 

'नागिन 3' (Nagin 3) सीरियलमध्ये दिसत आहे अनीता... 
अनीता सध्या एकता कपूरचा शो 'नागिन 3' मध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर ती 'ये हैं मोहब्बतें' च्या शगुनची भूमिकाही करत आहे. 

 

अनीता-रोहितची लव्ह स्टोरी... 
अनीताने जो व्हिडीओ शेयर आहे तो तिच्या रियल लाइफशी खूप मिळत जुळत आहे. रोहित रेड्डीला अनीताला पटवण्यासाठी खूप युक्त्या लढवाव्या लागल्या. अनीता आणि रोहित एकाच जिममध्ये वर्कआउटसाठी जात होते. रोहितला अनीता पहिल्या नजरेतच आवडली होती. त्यावेळी रोहितला माहित नव्हते की, अनीता अभिनेत्री आहे. 

 

रोहितने अनेकदा तिच्याशी बोलण्याचा आणि मैत्री करण्याचा प्रयत्न केला. पण अनीताने त्याला नेहमी इग्नोरच केले. खूप प्रयत्न केल्यानंतर एक फ्रेंडच्या मदतीने दोघांची मैत्री झाली. मग कपलने एकत्र पब पार्टीजमध्ये जायला सुरुवात केली. काही काळानंतर मैत्री प्रेमात रूपांतरित झाली आणि अनीताने 14 ऑक्टोबर 2013 ला तेलगू बॉयफ्रेंड रोहित रेड्डीसोबत लग्न केले. रोहित बिजनेसमॅन आहे आणि त्याचा व्यवसाय गोव्यामध्ये पसरलेला आहे. 

 

काव्यांजलि (2005-06) च्या सेटवर अनीता आणि अभिनेता एजाज खानच्या अफेयरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. पण काही वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. 

 

या टीव्ही शोज आणि चित्रपटांत केले आहे काम... 
मॉडेलिंगमध्ये सक्सेसफुल करियर बनवणाऱ्या अनिताने 'कभी सौतन कभी सहेली' (2001) या टीव्ही शोने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 'काव्यांजली', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसम से' यामध्ये तिने काम केले आहे. तिने 'कुछ तो है' (2003), 'ये दिल' (2003), 'कृष्णा कॉटेज' (2004), 'सिलसिले' (2005), 'रागिनी एमएमएस- 2- (2014), हीरो (2015) अशा काही चित्रपटांतही काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...