आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anjali Chand Took 6 Wickets Without Giving Single Run In Debut; T 20's New International World Record

अंजलीचे पदार्पणात ६ बळी; एकही धाव दिली नाही, टी-२० चा नवा आंतरराष्ट्रीय विश्वविक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोखरा - नेपाळची मध्यमगती गोलंदाज अंजली चंदने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये विश्वविक्रम रचला. पदार्पण सामन्यात अंजलीने मालदीवविरुद्ध ६ बळी घेतले, तेही एकही धाव न देता. तिने २.१ षटके गोलंदाजी केली. दक्षिण आशियाई स्पर्धेतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मालदीव टीमचा डाव १०.१ षटकांत केवळ १६ षटकांत ढेपाळला. 

विशेष म्हणजे त्याचे नऊ खेळाडू तर भोपळाही फोडू शकले नाहीत. हजमा नियाजने सर्वाधिक ९ धावा केल्या. अंजलीने सातव्या षटकांत ३ बळी घेतले आणि नवव्या षटकांत २ विकेट काढल्या. अकराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक बळी घेत मालदीवचा डाव संपवला. अंजलीसह करुणा भंडारीने २ गडी टिपले. दोन फलंदाज धावबाद झाले. यजमान नेपाळने केवळ ५ चेंडूंत सामना जिंकला. अंजली महिला  व पुरुष दोन्ही प्रकारात टी-२० मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार गोलंदाजी करणारी पहिली गोलंदाज बनली. मेस एलिसाने २०१९ मध्ये चीन विरुद्ध ३ धावांत ६ बळी घेतले होते. पुरुषांमध्ये दीपक चाहरने बांगलादेश विरुद्ध ३.२ षटकांत ७ धावा देत ६ गडी बाद केले होते. नेपाळमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये नेपाळ, मालदीवसह बांगलादेश, श्रीलंका संघ सहभागी झाले आहेत. मालदीवची संपूर्ण टीमने आणि नेपाळच्या संघातील २ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केले आहे.