आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजली दमानिया यांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली; 'बाबा मी शर्यतीत पहिला आलो' जोक केला ट्वीट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बाबा मी पहिला आलो' अशा आशयाचा विनोद ट्विटरवर शेअर करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. एक जोक ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 
 

या कारणांमुळे आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघातून विजय जवळपास निश्चित मानण्यात येत आहे
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने मैदानात आहेत. तर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले देखील आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पुतण्या विरोधात मनसेकडून उमेदवार उभा केला नाही. यामुळे आदित्य ठाकरे वरळीतून सहज निवडून येतील असे मानले जात आहे. दरम्यान यावर अंजली दमानियांनी एक जोक शेअर करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.