आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे कार्यकर्त्यांकडून अंजली दमानिया सोशल मीडियावर ट्रोल; राज ठाकरेंबाबत केलेले व्यक्तव्य भोवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब आज ईडी कार्यालयाकडे रवाना झाले होते. दरम्यान चौकशीला जात आहात की सत्यनारायणाच्या पुजेला? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. आता त्यांच्या या सवालावरून मनसे कार्यकर्ते आणि चाहत्यांनी अंजली यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.  

ईडीने कोहीनूर गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. यात 22 ऑगस्ट रोजी राज यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार ते सहकुटुंब ईडी कार्यालयाकडे जाण्यास रवाना झाले होते. यावरून चौकशीला जात आहात की सत्यनारायण पुजेला? सगळे मिळून माहिती देणार आहात का? का हा सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न आहे? असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले होते. अंजली यांच्या या वक्तव्याकरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 
 
 

लोकांच्या सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया 

       

       

       

   

   

 

बातम्या आणखी आहेत...